पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली व मा. अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील (अतिरीक्त कार्यभार) यांनी पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांना सध्या सुरु असलेल्या टाटा आयपीएल क्रिकेट सामने यावर चालणा-या बेटींग घेणा-या इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडील सपोनि संदीप शिंदे व अमलदार यांचे एक पथक तयार करुन टाटा आयपीएल क्रिकेट सामन्यांवर बेटींग घेणा-या इसमांवरती कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते.
नमुद पथकाने सांगली जिल्हयात टाटा आयपीएल क्रिकेट सामन्यांवर बेटींग घेणा-या इसमांची माहिती घेत असताना पथकातील दिपक गायकवाड, प्रशांत माळी यांना त्यांचे खास बातमीदारार्फत बातमी मिळाली की, इसम नामे विश्वनाथ संजय खांडेकर रा. गंगानगर रोड, वारणाली हा कुपवाड ते बाघमोडेनगर जाणारे रोडलगत कृष्णा मोरे यांचे मालकीचे शेतात असलेल्या शेडमध्ये सध्या सुरू असलेल्या टाटा आय. पी. एल. क्रिकेट लीग मैच मधील लखनऊ सुपर जाएंटस् व रॉयल चैलेंजर्स बेंगलोर या संघामध्ये सुरु असलेल्या क्रिकेट मैचवर लोकांचेकडुन मोबाईलद्वारे धावांवर व विजय पराजय यावर पैसे लावून घेवुन स्वतःचे फायद्याकरीता जुगाराचा (बेटींग) खेळ घेत आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाली, मिळाले बातमीची हकीकत सपोनि शिंदे यांनी वरिष्ठांना कळवुन मिळाले बातमीचे ठिकाणी कृष्णा मोरे यांचे शेतात शेडमध्ये पंच व पथकासह सदर ठिकाणी छापा मारला. तेथे काही लोक लॅपटॉप व मोबाईलच्या साहयाने क्रिकेट मॅचवर बेटींग जुगार खेळत व खेळवित असताना काही इसम दिसुन आले.
सदर हजर ठिकाणी असणा-या सर्व इसमाना सपोनि संदीप शिंदे यांनी त्यांचे नांव गांव विचारले असता, त्यांनी त्यांची नावे १) विश्वनाथ संजय खांडेकर वय २२ वर्षे रा. गंगानगर रोड, वारणाली २) रतन सिद्धू बनसोडे वय २७ वर्षे रा. आलिशान कॉलनी, कुपवाड ३) गणेश मल्लाप्पा कोळी वय २१ वर्षे रा. झेड पी कॉलनी, वारणाली ४) संतोष सुरेश पाडगे वय १९ वर्षे रा. महावीर नगर, विश्रामबाग अशी असलेचे सांगितले. सपोनि संदीप शिंदे यांनी नमुद इसमांना तेथे हजर असणेबाबतचे कारण विचारले असता विश्वनाथ खांडेकर याने सांगितले की, क्रिकेट लाईव्ह गुरु नावाचे अॅप ओपन करुन त्यामध्ये सुरु असलेल्या आयपीएलच्या मॅचचा स्कोअर व मॅचचा हार-जीत चा भाव पहात लोकांकडून पैसे लावून घेवून त्यांना बेटींगचे स्कोरवर जिंकल्यास एका रुपयास एक रुपया याप्रमाणे व क्रिकेटचे मॅचचे हार जीतवर भाव असेल त्याप्रमाणे वाढीव भावाने पैसे देत असलेचे सांगितले. त्यावेळी त्याचे कब्जातून एच पी कंपनीचा लॅपटॉप, एक वीवो कंपनीचा मोबाईल, एक लावा कंपनीचा की पेंडचा मोबाईल, एक आयटेल कंपनीचा काळे रंगाचा की पेंडचा मोबाईल, एक लावा कंपनीचा आकाशी रंगाचा की पेंडचा मोबाईल, एक लावा कंपनीचा काळे रंगाचा की पहचा मोबाईल, एक लावा कंपनीचा पांढरे रंगाचा की पेंडचा मोबाईल, एक श्री साई बाबा दैनंदिनी २०२३ वही त्यावर बेटींग जुगार खेळणा-या ग्राहकांचे मोबाईल नंबर असलेली, एक निळे शाईचा बॉल पेन, एक रेडमी कंपनीचा नोट ९ मॉडेलचा मोबाईल, एक रेडमी कंपनीचा के २० प्रो मॉडेलचा मोबाईल, एक रेडमी कंपनीचा नोट ९ प्रो मॉडेलचा मोबाईल सोबत गुन्हयात वापरण्यात येणारी वाहने एक पांढरे रंगाची होंडा अॅक्टीव्हा मोटर सायकल, एक करडया रंगाची सुझुकी अॅक्सेस १२५ मोटर सायकल, एक करडया रंगाची होंडा अॅक्टीव्हा ३ जी मोटर सायकल, एक काळया रंगाची हिरो पॅशन प्रो मोटर सायकल अशी ०४ दुचाकी वाहने असा एकुण २,८०,००५/- रुपयांचा मुद्देमाल सविस्तर पंचनाम्याने जप्त करुन त्यांचे विरुध्द कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे मुंबई जुगार अधिनियम कलम ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हयात अटक बुकी नामे विश्वनाथ संजय खांडेकर याचेकडून जप्त डायरीमध्ये क्रिकेट मॅचवर बेटींग मटका जुगार खेळणारे व खेळविणारे २३ इसमांची नावे व मोबाईल नंबरची यादी प्राप्त झाल्याने सदर यादीप्रमाणे संशयितांची नावे व मोबाईल नंबर फिर्यादीमध्ये निष्पन्न केली आहे. सदर यादीतील संशयीतांचा शोध सुरु आहे. सदर गुन्हयाचा तपास एम आय डी सी पोलीस ठाणे सांगली करीत आहे.