सोलापूरातील देगाव ते कवठे रस्त्यावरील कॅनालच्या बाजूच्या असलेल्या एका शेतामध्ये एक युवक व युवतीचा मृतदेह एकाच झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास निदर्शनास आली घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी लादेन यांची ॲम्बुलन्स मागून त्या दोन्ही मृतदेहाला खाली उतरून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल कडे शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले आहे.
लक्ष्मी शिवाजी तांबे असे मृत युवतीचे नाव असून ती ११ वीला भारतीय विद्यापीठ येथे शिकत आहे तर सुरज कुंडलीक चव्हाण राहणार खुनेश्र्वर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर असे मृत तरुणांचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही मृतदेह सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असून देण्यात आली आहे. हे प्रेमी युगल आहे की आणखी काय याबाबत अजून स्पष्ट झाले नाही आत्महत्येचे कारण ही समोर आलेले नाही. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहे.