शनिवारी रात्री जूना वालचंद कॉलेज रोड चिप्पा मार्केट येथे अनोळखी व्यक्तिचा डोक्यात फारशी सारखा दगड घालुन खून करण्यात आला. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.अशोक चौक परिसरात चिप्पा मार्केट आहे, रविवार असल्याने हे मार्केट बंद असते, सकाळच्या सुमारास मार्केटच्या मध्यभागी एका कट्ट्यावर युवकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह नागरिकांना दिसून आला. ताबडतोब त्यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात खबर दिली, पोलीस निरीक्षक मोगल हे आपल्या पथकासह दाखल झाले, पंचनामा करून त्यांनी लादेन यांची अंबुलन्स बोलावून घेतली.
लादेन यांच्या वाहनात मृतदेह शवविच्छेदन साठी सिव्हील हॉस्पिटल कडे पाठविण्यात आला आहे. या मृत युवकाची ओळख पटलेली नाही. चिप्पा मार्केट परिसरात रात्रीच्या सुमारास कुणीही नसते, तिथे अवैध गोष्टी चालतात अशी नागरिकांची ओरड आहे. त्यातूनच हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.