भंडारा जिल्ह्याच्या पचारा गावात पनीर तयार करण्याचा कारखाना असून या कारखान्यातून निघणाऱ्या पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची जवळपास पाच एकर शेती खराब झाली आहे.
तुमसर तालुक्यातील पचारा गावालगत असलेल्या शेतीसिवारात पनीर तयार करण्याचा कारखाना आहे. हा कारखाना येरली येथिल संजय पटले यांच्या मालकीचा आहे. कारखाना शेतात असल्याने कारखान्याला लागुन इतर शेतकऱ्यांची शेती आहे. पनीर कारखान्यातील खराब पाण्याला फिल्टर करुण सोडायचे आहे. पण कारखान्यात फिल्टर प्लांट नाही.
त्यामुळे वाटेल त्या जागेत कारखान्याचा दुषित पाणी सोडला जातो. पण आता शेतकर्यांनी धान शेती लागवड केली असल्याने त्यांच्या शेतात पाणी जात शेतीत पाण्याचा लालसर थर बसून जवळपास 5 एकरावरील धान पीक खराब झालं आहे. या संबंधित शेतकर्यांनी कारखाना मालकाला वारंवार सांगितलं पण कारखाना मालक दादागिरी करत तुम्हाला जो बनते ते करा अशा उत्तर देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याची तक्रार तुमसर पोलीसात दिली पण पोलिसांनी सुध्दा काहीही कारवाही केली नाही. आता या शेतकऱ्यांच्या शेत पिकाचा नुकसान होत असल्याने त्यांच्या नुकसान भरपाई कोन देणार त्यामुळे आता शेतकऱ्याचा वाली कोण अशा प्रश्न उपस्थित होत आहे. या विषयी कारखाना मालकाशी संपर्क केला असताना त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे.