भंडारा शहरातील राणी लक्ष्मीबाई वार्ड येथे लोखंडी रॉडने वार करत एकाचा मृत्यू तर दोन जखमी झाला आहे. आरोपी अक्षय शाहू व मृतक यांचा घर जवळ असल्याने आरोपीचा पाच वर्षाचा मुलगा याने मृतक शालिकराम शहारे याला चप्पल फेकून मारली त्यात शालीकराम यांनी त्या मुलाला गालावर थापड मारली. म्हणुन आरोपी अक्षय शाहू यांनी मृतक शालिकराम शहारे याच्या सोबत वाद सूरु केला.
व लोखंडी रॉडने शालिकराम यांच्यावर वार केला त्यात मृत्कचा मुलागा किशोर, पत्नी सुध्दा अल्याण्याने आरोपीने त्याला देखिल मारहाण केली. यात शालिकराम शहारे याचा जागीच मृत्यू झाला तर किशोर, मृतकाची पत्नी जखमी झाली असुन याची माहिती भंडारा शहर पोलिसांना होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत आरोपीला अटक केली आहे. तर जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.