जिल्ह्यात शनिवार सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. तर याचा फटका मिरची पिकांना बसला आहे. भंडारा तालुक्यातील गुंजेपार येथिल अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे लागवड केलेल्या मिरची पिक खराब होण्याच्या मार्गावर असून परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...