भंडारा जिल्ह्यात खरिप हंगामातील हजारों क्विंटल धान गायब झाला आहे. या पैकी तिन धान खरेदी केंद्र लाखांदूर तालुक्यांतील असुन राजकिय नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे आहे. एकीकडे हेच राजकिय नेते विधानसभेत हंगामात करत चौकशीची मागणी करतात आणि दुर कडे त्यांचेच कार्यकर्ते धान खरेदी केंद्र चालवून शासनाला लुटत आहेत. लाखांदूर कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये प्रशासक असताना येथील सचिवाने धान खरेदी करत 4 हजार 500 क्विंटल धान शासनाला दिला नाही, तर बेलाटी येथिल पुष्पमृत बहुदेशिय बेरोजगार सेवा सहकारी संस्था यांच्याकडे, 3604 क्विंटल धान गायब आहे. येथील केन्द्र चालक मनोज चुटे हे काँगेसच्या प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जात असून त्यांच्या सोबात त्यांचे फोटो सुध्दा आहेत. तर राष्ट्रसंत सुशिक्षित बेरोजगार संस्था गवराळा या संस्थेने तर 14802 क्विंटल धान शासनाला दिला नाही. त्यामुळे हे धान माफिया कोणत्या ना कोणत्या राजकिय पक्षासी संपर्कात असल्याने असे घोटाळे करण्यास त्यांना बळ मिळते. आता या धान खरेदी केंद्रावर पणन विभाग काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...