IND vs NZ: विश्वचषक २०२३ मध्ये आज भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात पावसामुळे व्यत्यय येऊ शकतो. याबाबतचे ताजे अपडेट समोर आले आहेत. या महत्त्वच्या सामन्यात आता पाऊस गोंधळ घालणारअसल्याची चिन्हे दिसत आहेत.
आज भारत आणि न्यूझीलंड या दोन बलाढ्य संघांमध्ये विश्वचषक २०२३ चा २१वा सामना रंगणार आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाला येथे दुपारी २ वाजता हा सामना सुरू होईल. मात्र सामन्यापूर्वीच पावसाची भीती प्रेक्षकांना सतावू लागली आहे. त्याचवेळी, आता धरमशालाच्या हवामानाबाबत ताजे अपडेट समोर आले आहेत. जे भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात पावसाची टक्केवारी किती शक्यता आहे हे दर्शवते. अशा स्थितीत आज दोन्ही संघांना पावसाला डोळ्यासमोर ठेवून आपापली रणनीती आखावी लागणार आहे.
भारत-न्यूझीलंड सामन्यात पावसाचा धोका!
Accuweather.com च्या अहवालानुसार, आज धरमशालामध्ये पावसाची ४० टक्के शक्यता आहे तर तापमान १२-१३ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. याशिवाय दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे आणि दुपारच्या दरम्यान वादळी वाऱ्याची शक्यता आहे. तापमान सुमारे १३ अंश सेल्सिअस राहील आणि ते ७४% ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. सायंकाळनंतर तापमानात आणखी घट होईल आणि शहरात १०० टक्के ढगाळ वातावरण राहील.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात पावसामुळे काही व्यत्यय येऊ शकतो. यापूर्वी २०२३ च्या विश्वचषकाचा पहिला सामना नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात येथे खेळला गेला होता. या सामन्यातही पावसामुळे व्यत्यय आला होता. त्यामुळे हा सामना ४३-४३ षटकांचा करण्यात आला.
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये होणार आजचा सामना रद्द झाल्यास गट सामन्यातील सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. या दोन्ही संघांना १-१ गुण देऊन बरोबरी साधण्यात येईल.
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात या दोन संघांमध्ये आतापर्यंत ११६ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये भारताने ५८ तर न्यूझीलंडने ५० सामन्या मध्ये विजय मिळवला आहे. याशिवाय ७ सामने अनिर्णित राहिले असून एक सामना बरोबरीत सुटला आहे, परंतु विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेचा विचार केला तर येथे न्यूझीलंडचे पारडे जड आहे. विश्वचषकाच्या इतिहासात हे दोन संघ ९ वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी ५ मध्ये न्यूझीलंडने तर ३ मध्ये भारताने बाजी मारली आहे. एक सामना अनिर्णित राहिला. यामध्ये भारतीय संघ २०१९ च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पराभव कधीही विसरू शकणार नाही.