तालुक्यातील हाळदा गावाजवळ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील ७२ वर्षीय वृध्द आजोबा व २० वर्षीय नातवाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि. ६ जानेवारी रोजी रात्री ८ : ३० वाजताच्या दरम्यान सुमारास घडली आहे.रामा नरसप्पा पटपेवाड रा. पवना तालुका हिमायतनगर , हर्षवर्धन चंद्रकात दंतलवाड रा. चींचाळा तालुका बिलोली असे अपघातात मृत्यू झालेल्या वृध्द आजोबा व नातवाचे नाव आहे. सदरील वृध्द आजोबा बीलोलीमधे राहत असलेल्या आपल्या मुलीकडील नातेवाईकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेले होते. दिनांक ६ शुक्रवार रोजी आपल्या गावी पवना कडे दुचाकी (क्र. एम एच २६ सीसी ९७६७) वरुन आपल्या नातवा सोबत जात होते.
दरम्यान भोकर तालुक्यातील हाळदा गावच्या अबादी जवळ अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर क्र. एम एच २६ बी क्यू ०७५० ने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील आजोबा नातवाचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळी धाव घेऊन ट्रॅक्टर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असुन घटने बाबद भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या रेतीची रॉयल्टी व धक्के बंद असल्याने रात्री बे रात्री छुप्या मार्गाने अवैध रेती तस्करांचे प्रमाण भोकर शहरात वाढल्याने रात्री यासारखे आणखी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही करीता भोकर मधिल वाढलेल्या या अवैध रेती वाहतूकीकडे भोकर महसूल विभाग लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.