भोकर शहरातील सुभेदार रामजी आंबेडकर चौक उमरी- म्हैसा बायपास रोड ठिकाणी बुधवार दिनांक २५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान भोकरहुन उमरीकडे जाणाऱ्या एम एच २६ ए ए ५५५६ क्रमांकाच्या कार ला तेलंगणातून नांदेडकडे भरधाव वेगात जानाऱ्या टी एस ०१ यू ए ७७१२ क्रमांकाच्या सिमेंट वाहू ट्रकने जोराची धडक दिली या भिषण अपघातात कार चालक भोकर शहरातील शुभम अनिल पांचाळ हा गंभीर जखमी झाला.
जखमींवर भोकर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करून अधिक उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे. अपघात एव्हढा भीषण होता की ट्रॅक कार चा चेंदामेंदा करून रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या टाटा पिकअप एम एच २६ ए डी ५५४० क्रमांक गाडीला व बाजूस असलेल्या मोटरसायकल व पान टपरीला वीस फूट लांब घासत नेवून त्यावर पलटी झाला. ट्रॅक चालक अपघात ठिकाणी ट्रक सोडून पसार झाला आहे.
भोकर शहरासह तालुक्यातील नागरिकांनी येथील राष्ट्रिय महामार्ग उपविभाग ( विशेष ) भोकर यांना गतिरोधक बसविण्यासाठी अनेक वेळा निवेदने देवुनही याठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले नाही. मागील २३ डिसेंरबर रोजी या ठिकाणी भरधाव ट्रॅकने ऑटोला धडक दिली होती या भिषण अपघातात तालुक्यातील रायखोड गावची ऑटोत बसलेली महिला प्रवाशी जागीच ठार झाली तर अन्य दोघेंजन गंभीर होते.
हि घटना ताजी असतानाच भोकर येथील विशेष राष्ट्रिय महामार्ग विभागातील अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणामुळे व बेजबाबदारपणामुळेसदरील चौकात अपघाताची मालिका गेल्या अनेक वर्षापासून चालू असून ह्या चौकात मागील चार वर्षांत अनेक लोकांचे नाहक बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
त्यात आजचा भीषण अपघाताने त्यात भर पडली या घटनेमुळे तालुक्यातील नागरिकांतून विशेष राष्ट्रिय महामार्ग विभाग व अधिकाऱ्यांचा विरुद्ध रोश व्यक्त केला जात आहे.
उमरी बायपास रोडवर तत्काळ गतिरोधक बसवून पर्यायी मार्ग म्हणून या ठिकाणी उडाणपूल व्हावा अशी मागणी तालुक्यातील नागरिकांतून केली जात आहे.