जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी येथे इयत्ता दहावीच्या परिक्षा देणार्या शाळकरी मुलीने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.3 मार्च दुपारच्या सुमारास घडली असून पोलिसांनी प्राथमिक पंचनामा केला आहे.भोगाव देवी येथे फलाटावर राहणारे शेतकरी विलास साखरे यांची मुलगी जि.प.शाळा भोगाव देवी येथे शिक्षण घेत होती दहावी वर्गीचा काल त्यांनी जिंतूरात परिक्षा देखील दिली होती आज पेपर नसल्याने उद्या त्याचा पुढील पेपर असल्याने ती घरात अभ्यास करत होती.
तेव्हा घरात ती एकटीच होती दुपारी तीनच्या सुमारास घरातील पंख्याला साडी बांधून गळफास घेतल्याचे लक्षात येताच तात्काळ पोलीसांना माहिती देताच घटनास्थळी पो.नि.कुंदनकुमार वाघमारे,सपोनि कोरके,पो.ह.दत्तात्रेय गुगाणे,पो.काॅ.धबडगे,पो.काॅ.कांबळे आदीं दाखल होत ग्रामस्थांच्या मदतीने लटकलेले शव काढून घटनास्थळी प्राथमीक पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रोती कोडगीरे यांनी तपासून त्यास मृत घोषित केले असून परिक्षेच्या मानसीक त्रास मुळे आत्महत्या केल्याचे बोले जात असून बातमी देईपर्यंत पोलीसात नोंद झालेली नव्हती.