मंगळवेढा हुलजंती गावानजीक प्रवासी वाहतूक करणारी खाजगी बस पलटी होऊन अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली असून हा अपघात मंगळवारी पहाटे साडे सहाच्या सुमारास झाला. अपघाताची माहिती मिळताच 108 क्रमांक ॲम्बुलन्सने अपघातातील जखमींना मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय, पंढरपूर विठ्ठल मंदिर दर्शन मंडप व सांगोला ग्रामीण रुग्णालयाच्या ऍम्बुलन्समध्ये घालून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान विजापूरहून भाविक या बसमध्ये बसून पंढरपूर कडे निघाले होते. मरवडे-हुलजंती रोडवर आल्यानंतर या ठिकाणी ब्रिजचे काम चालू आहे. त्या ठिकाणी आल्यावर ही बस पलटी झाली यामध्ये 35 प्रवासी प्रवास करत होते त्यामध्ये काहीजण जखमी झाले आहेत गंभीर जखमी असले तरी किरकोळ जखमी असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...