मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांना गुप्त माहिती मिळाल्यावर त्यांनी आपल्या सहकार्या समवेत सांगोला नाका येथे सापळा रचला, आणि एका ट्रकला थांबवून त्याची तपासणी केली असता आणि चालकाकडे विचारणा केली तेव्हा त्याने ट्रकमध्ये सुगंधी तंबाखू आणि गुटखा असल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी ट्रक पोलीस स्टेशनला नेऊन अवैध गुटख्याची पोती मोजली त्यावेळी त्याची किंमत ३२ लाख रुपये झाली. हा अवैध गुटख्याचा साठा आणि त्याची वाहतूक करणारा ट्रक असा ४२ लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतला. हा गुटका कर्नाटक राज्यातील निपाणीहून सोलापूरला नेला जात होता.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...