देवठाणा-मंठा येथील सुखदेव उत्तमराव मोरे यांच्याकडे सात एक्कर ऊसाचे पिक असून गुरुवारी ( ता. १२ ) सकाळी अकरा वाजे दरम्यान शेजारील शेतातील पाचट पेटलेली असताना अचानक सुखदेव मोरे यांच्या ऊसाच्या पिकाला आग लागली. या आगीत शेतकऱ्याचा सात पैकी तीन एकर ऊस जळून खाक झाला असून अंदाजे तीन लाख रुपये नुकसान झाले आहे. देवठाण येथे उसाला आग लागल्याचे कळताच नगराध्यक्ष मीरा बाळासाहेब बोराडे व मुख्याधिकारी रितेश बैरागी यांच्या सूचनेनुसार नगरपंचायतचा अग्निशमन शेतात दाखल झाला. यावेळी अग्निशमन पथकाचे असेफ पठाण, प्रविण राठोड, सतिष चव्हाण, अंजित चव्हाण यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...