मंत्रालय बँकेची शतक पुर्तीकडे वाटचाल सुरू असून याबँकेने नुकताच सन २१-२२ सालासाठी पगारदार नोकरांची आदर्श बँक म्हणून प्रथम क्रमांक पटकावला आहे मंत्रालय बँकेच्या नविन – ४ शाखा – पुणे , नगर, पालघर व नाशिक येथे लवकरच सुरू करणार आहे. मंत्रालय बँकेवर १५ संचालक आहेत त्यातील सर्वांशीच सलोख्याचे व आदराचे स्थान असलेले सुनिल खाडे यांची एक मुखाने बिनविरोध निवड करण्याचे ठरले त्यासाठी विशेत: बँकेचे अध्यक्ष प्रमोद पंडीत व सहकारी संचाल मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले त्या सर्वांचे सुनिल खाडे यांनी आभार व्यक्त केले.
बँकेच्या उपाध्यक्ष पदाची निवडणूक जिल्हा सहकारी निडणूक अधिकारी नितीन काळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सर्व बँकेचे संचालक मंडळ तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व कर्मचारी यांनी खाडे यांचे पुष्पगुच्छ देऊन पुढील कारकीर्दिस शुभेच्छा दिल्या.