Tuesday, July 1, 2025
dainiktarunbharat.com
Advertisement
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मदनदासजींनी दिलेल्या कार्यमंत्रानुसार कार्य पुढे नेऊया सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 25, 2023
in maharashtra
0
मदनदासजींनी दिलेल्या कार्यमंत्रानुसार कार्य पुढे नेऊया  सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत….
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे, दि. २५ जुलै- आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला विचारांनी आणि आंतरिक स्नेहाने प्रेरित करून कोणत्या ना कोणत्या कामात सामाजिक कार्यात सक्रिय करण्याचे फार मोठे कार्य मदनदासजी यांनी केले. त्यांनी दिलेली शिकवण आचरणात आणून काम वाढविणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मदनदासजी देवी यांना मंगळवारी श्रद्धांजली अर्पण केली. मदनदासजींनी दिलेल्या कार्यमंत्रानुसार कार्य पुढे नेऊया, असेही ते म्हणाले.

ज्येष्ठ प्रचारक आणि संघाचे माजी सहसरकार्यवाह मदनदासजी देवी यांचे काल पहाटे बेंगळूरू येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव आज सकाळी पुण्यात आणण्यात आले. रा.स्व. संघाच्या मोतीबाग येथील कार्यालयात ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर वैकुंठ स्मशान भूमी येथे मदनदासजी यांचे पुतणे राधेश्याम देवी यांनी अंतिम संस्कार केले.

याप्रसंगी झालेल्या श्रद्धांजली सभेमध्ये डॉ. भागवत बोलत होते. यावेळी सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाले, प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आदि उपस्थित होते.

मदनदासजी देवी व्यक्तीच्या मनाला स्पर्श करीत असत. जीवनाला योग्य दिशा देणारे ते पालक होते. संघटनेचे आणि मनुष्य जोडण्याचे काम करीत असताना खूप काही सहन करावे लागते. हे सोपे नाही. अशावेळी आंतरिक ज्वलन सहन करीत असताना देखील त्यांनी स्वतः स्थितप्रज्ञाप्रमाणे आयुष्य व्यतीत केले. जाताना देखील ते आनंददायी आणि आनंदी होते, असेही डॉ. भागवत यांनी सांगितले.
सरसंघचालक म्हणाले, मदनदासजी देवी यांच्या जाण्याने मनामध्ये संमिश्र भावना आहे. जन्ममृत्यू हा सृष्टीचा नियम आहे. जो हजारो-लाखो लोकांना आपुलकीने बांधतो अशा व्यक्तीच्या जाण्याचे दुःख सर्वव्यापी असते. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रातील मोठ्या जनसमुदायाला देखील दुःख झालेले आहे. त्यांनी केवळ संघटनेचे काम केले असे नाही तर मनुष्य जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. व्यक्तीच्या मनाला स्पर्श करण्याची कला त्यांना अवगत होती. ते कार्यकर्त्यांना आपले मानायचे, त्यांना सांभाळायचे. मी जेव्हा त्यांच्या संपर्कात आलो तेव्हा देखील हा अनुभव मी घेतला. बालवयातील शाखेच्या मित्रांपासून ते विविध संघटनांच्या प्रमुखांपर्यंतच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा निकटचा संपर्क होता. ते सर्वांची काळजी करायचे. प्रत्येकाची त्यांना संपूर्ण माहिती असायची.

त्यांचा स्नेहस्पर्श झाला ही मी धन्यता मानतो. मदनदासजी संघटनेचे आणि विचारांचे पक्के होते. कार्यकर्त्यांनी केलल्या चुका ते स्नेहपूर्वक दुरुस्त करायचे. कोणत्याही व्यक्तीचे मूल्यांकन करताना व्यक्तीचे अवमूल्यन होणार नाही याची ते दक्षता घेत. यशवंतराव केळकर यांचा आदर्श घेऊन त्यांनी काम वाढविले. मनुष्याला मोह बिघडवतो. या सर्वांच्या पलीकडे जाऊन ध्येयाप्रती समर्पित कार्यकर्ते त्यांनी तयार केले. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे होते. त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. मात्र, माझ्या जाण्यानंतर हे काम न थांबवता आणखी वाढत जाईल ही शिकवण त्यांनी दिली आहे. आजारपणामुळे ते मागील काही वर्ष सक्रिय कामात नसले तरी देखील त्यांच्यामध्ये एकटेपणा आलेला नव्हता. ते अतिशय स्थितप्रज्ञ होते. अंतिम क्षणी देखील ते हसतमुख होते. ध्येयाप्रती असलेल्या क्रियाशील समर्पणातून आलेली ही प्रसन्नता होती, असे डॉ. भागवत म्हणाले. कार्याचा जो मंत्र त्यांनी आम्हाला शिकवला त्यानुसार पुढे जात राहणे, ही त्यांना श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

संघटनेचे तत्वज्ञान रुजवले- मराठे
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची वैचारिक बैठक तयार करण्याचे आणि संघटनेचे तत्वज्ञान उत्तमप्रकारे कार्यकर्त्यांमध्ये रुजवण्याचे अत्यंत महत्तपूर्ण काम मदनदासजी यांनी केले. संघटनेला त्यांनी वैचारिक अधिष्ठान दिले. कार्यकर्त्यांबरोबर त्यांचे संबंध हे पारिवारिक स्वरूपाचे होते. कार्यकर्त्याच्या केवळ संघटनेतील कामाची नाही, तर त्याच्या संपूर्ण जीवनाची ते काळजी घेत असत, असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी यावेळी सांगितले. अत्यंत तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रेमळ स्वभाव आणि आत्मियता या त्यांच्या गुणांमुळे त्यांच्या प्रेरणेने देशात हजारो कार्यकर्ते तयार केले, असेही मराठे म्हणाले.

साऱ्यांचे सहकारी- नड्डा
देशातील हजारो कार्यकर्त्यांना मदनदासजींनी कार्याची दृष्टी दिली, त्यांना जीवनदिशा दिली, त्यांच्यावर संस्कार केले आणि जीवनाला उद्देश दिला, अशा शब्दांत जे. पी. नड्डा यांनी मदनदासजींच्या कार्याचे वर्णन केले. साऱ्या युवकांना ते आपले वरिष्ठ सहकारी आहेत, असेच नेहमी वाटत असे. त्यांचे मार्गदर्शन ज्याला घ्यायचे असेल त्याच्यासाठी ते सदैव सहजतेने उपलब्ध होत असत. संघटनेसमोर अनेक अडचणी असतानाही संघटनेचा विचार कसा पुढे नेता येऊ शकतो, हे आम्ही त्यांच्याकडे पाहून शिकलो, असेही नड्डा म्हणाले. संघटनशास्त्राचा त्यांचा सखोल अभ्यास होता. प्रवास कसा करायचा, बैठक कशी घ्यायची, वार्तालाप कसा करायचा अशा अनेक गोष्टींचे धडे ते कार्यकर्त्यांना देत असत. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत राहणे आणि तो मार्ग अधिक सुदृढ करणे, ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही नड्डा यांनी सांगितले.

मोतीबाग येथे अंत्यदर्शन
संघ कार्यालयात सरसंघचालक व सरकार्यवाहांची आदरांजली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदासजी देवी यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी मंगळवारी सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते उच्चपदस्थ मंत्र्यांपर्यंत सर्व स्तरातील शेकडो नागरिकांची उपस्थिती राहिली. अंत्यसंस्कारासाठी वैकुंठ स्मशानभूमीत नेण्यापूर्वी त्यांचे पार्थिव शहरातील मोतीबाग संघ कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अनेक दशकांपासून त्यांचे जवळचे सहकारी असलेल्यांपासून ते ज्यांना त्यांनी दीर्घकाळ मार्गदर्शन केले असे कार्यकर्ते, तसेच रा. स्व. संघ आणि संबंधित संघटनांचे वरिष्ठ पदाधिकारीही त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आले. त्यांनी स्व. मदनदासजी यांच्या शोकग्रस्त कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी मदनदासजी देवी यांचे भाऊ खुशालदास देवी, भगिनी आणि कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते. स्व. मदनदासजी यांना श्रद्धांजली अर्पण करणाऱ्यांमध्ये सरसंघचालक मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाले, रा. स्व. संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य सुरेशजी सोनी व अनिरुद्ध देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, माजी प्रांत कार्यवाह विनायकराव थोरात, अभाविपचे अखिल भारतीय संघटन मंत्री आशिष चौहान, सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, ज्येष्ठ कार्यकर्त्या गीताताई गुंडे, गिरीश प्रभुणे आदींचा समावेश होता. श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित असलेल्या नेत्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे प्रमुख होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही त्यांना आदरांजली वाहिली.

पुणे, मुंबई, दिल्लीत श्रद्धांजली सभा
मदनदासजी देवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ३१ जुलै रोजी दिल्लीत, ७ ऑगस्ट रोजी पुण्यात आणि ८ ऑगस्ट रोजी मुंबईत श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

Previous Post

जिल्हा बँकेत बच्चू कडूंनी करून दाखवलं! आमदार यशोमती ठाकूर लाइव्ह….

Next Post

सोलापूर दिवसभर रिमझिम….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सोलापूर दिवसभर रिमझिम….

सोलापूर दिवसभर रिमझिम....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विमान अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भारत-इंग्लंड संघांनी वाहिली श्रद्धांजली

विमान अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भारत-इंग्लंड संघांनी वाहिली श्रद्धांजली

June 20, 2025
‘भारत आता फक्त विचार करत नाही, दिशा देखील ठरवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘भारत आता फक्त विचार करत नाही, दिशा देखील ठरवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 1, 2025
महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी मल्टीमीडिया प्रचाराचा उपयोग जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांचे प्रतिपादन

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी मल्टीमीडिया प्रचाराचा उपयोग जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांचे प्रतिपादन

March 22, 2025
मोमीन शेख निसार महेबूब यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

मोमीन शेख निसार महेबूब यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

March 3, 2025
मुदखेड येथील तिसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

मुदखेड येथील तिसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

March 3, 2025
वादग्रस्त सायफळ वाळू घाट पुन्हा काढला खोदून

वादग्रस्त सायफळ वाळू घाट पुन्हा काढला खोदून

March 3, 2025
धुळे : घरफोडी करणा-या अट्टल चोराला धुळे तालुका पोलीसांनी ताब्यात घेतले

पंकज नगरात घरफोडी; रोख ५ हजार रूपयांसह लाखोंचे दागिने चोरून नेले

March 3, 2025
लिफ्ट मागण्याच्या बहाण्यानं दुचाकीवर बसलेल्या महिलेनं एका पिग्मी एजंटला २५ हजार रुपयांना लुटलं….

रात्री दोन दुकाने चोरट्यांनी फोडल्या मुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले

March 3, 2025

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 10, 2024
0

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 26, 2024
0

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 23, 2024
0

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 21, 2024
0

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 21, 2024
0

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 19, 2024
0

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 17, 2024
0

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

Load More

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 26, 2025
0

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 30, 2024
0

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 23, 2024
0

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...

बार्शी विधानसभा २४६ मधील सकाळी ७ ते ९ मध्ये झालेले मतदान.

22 फेरी सुभाष देशमुख 58 हजार 27 मतांची आघाडी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 23, 2024
0

22 फेरी सुभाष देशमुख 58 हजार 27 मतांची आघाडी सुभाष देशमुख 94 हजार754 अमर पाटील 36हजार 724हजार

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वृत्त संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group