मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी सोलापूरच्या वाडी-सोलापूर विभागाचे निरीक्षण केले. यावेळी महाव्यवस्थापकांनी वाडी येथे रनींग रुम, मियावाकी वृक्षारोपण, रूट रिले इंटरलॉकिंग (RRI) केबिन, क्रू लॉबी, अपघात निवारण ट्रेन/अपघात निवारण वैद्यकीय उपकरणांची पाहणी केली. रनिंग स्टाफसाठी वाडी रनिंग रूममध्ये अतिरिक्त बेड उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
त्यांनी वाडी आणि शहाबाद दरम्यानचा कोगनी पूल, मारतूर येथील ट्रॅक्शन सबस्टेशन, कलबुर्गी रेल्वे स्थानकातील प्रतिक्षा कक्ष तसेच केटरिंग स्टॉल, पीआरएस सेंटर आणि रेल्वे कॉलनीची पाहणी करत महाव्यवस्थापकांनी ट्रॅक मशीन डेपोचे निरीक्षण केले, लोकप्रतिनिधींकडून निवेदने स्विकारले, युनियन प्रतिनिधींसोबत बैठक घेतली.
त्यांनी ग्राउंड लेव्हल स्टाफशी संवाद साधला आणि सुरक्षित ट्रेन परीचालनासाठी आवश्यक बाबींवर भर दिला. कलबुर्गी आणि दुधनी स्थानकांदरम्यान स्पीड ट्रायल रन करण्यात आली. या निरीक्षण दौऱ्यात सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरजकुमार दोहरे, प्रधान विभाग प्रमुख व सोलापूर विभागातील शाखा अधिकारी उपस्थित होते.