लातूर दि.5 मार्च- माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या चुलत भावाने लातूर येथील राहत्या घरी गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चंद्रशेखर पाटील चाकूरकर (वय 81) यांनी आपल्या राहत्या घरी स्वतःच्या परवानाधारक पिस्तूल मधून गोळी झाडून त्यांनी आपले जीवन संपवले आहे. चंद्रशेखर पाटील चाकूरकर हे लातूर शहरातील आदर्श कॉलनी भागात राहतात. ते शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलत भाऊ आहेत. चंद्रशेखर पाटील हे दररोज सकाळी घरातून फिरायला बाहेर जात असत. त्यानंतर ते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरी येत. चहापाणी झाल्यावर तेथील पेपर वाचत बसणे ही त्यांची अनेक वर्षापासूनची सवय होती. त्यानंतर बाजूलाच असलेल्या स्वतःच्या घरी ते जात असत. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या कुटुंबातील अधिक तर व्यक्ती हे लातूर येथील निवासस्थानी कधीतरी हजर राहत असतात. शिवराज पाटील चाकूरकर यांचे चिरंजीव शैलेश पाटील हे सकाळी घरातच होते. नित्याप्रमाणे चंद्रशेखर पाटील चाकूरकर हे घरात आल्यावर त्यांना चहा घ्या. मी आवरून येतो. असे सांगून ते निघून गेले. काही वेळाने गोळीचा आवाज झाला. घरातील नोकर आणि शैलेश पाटील हे धावत हॉलमध्ये आले. त्यांना तेथे चंद्रशेखर पाटील चाकूरकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. घटनेची माहिती तात्काळ लातूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चंद्रशेखर पाटील हे वडिलोपार्जित शेती पाहत होते. त्यांना दोन मुले, दोन मुली आहेत. सगळ्यांची लग्न झाली आहेत. ते सध्या एका मुलाबरोबर चाकूरकर यांच्या घराच्या बाजूला असलेल्या फ्लॅटमध्ये राहत होते. त्यांना अनेक शारीरिक व्याधीही जडल्या होत्या. सततच्या आजाराला ते कंटाळून गेले होते. चंद्रशेखर पाटील चाकूरकर यांचे चिरंजीव अॅडवोकेट लिंगराज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रशेखर पाटील चाकूरकर यांची बायपास शस्त्रक्रिया झाली होती. अशातच अनेक व्याधीही त्यांना जडल्या होत्या. सततच्या आजाराला ते कंटाळून गेले होते. म्हणून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रविवारी सकाळी ते दररोज प्रमाणे घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या मोबाईल मधील परिचित असलेल्या अनेक व्यक्तींना गुड बाय असा टेक्स्ट मेसेज पाठवला होता. व्हाट्सअपवर स्टेटस ठेवला होता. तोही अशा आशयाचा होता. या आत्महत्येच्या घटनेमुळे लातूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...