महाराष्ट्रातील विविध शासकीय क्षेत्रातील कर्मचारी जुनी पेन्शन लागु करा यासाठी राज्यातील नगर परिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी यांनी संप पुकारला.प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी राज्यातील कर्मचारी दि.१४ मार्च रोजी पासुन बेमुदत संप असुन राज्यातील नगर परिषद नगर पंचायत व संवर्ग कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या शासनास वेळोवेळी निवेदने दिले असता शासनाने नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्याची दखल अद्याप घेतलेली नसल्याने त्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष रामेश्वर वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली मुदखेड नगरपरिषद कर्मचारी यांच्या वतीने आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत.यावेळी प्रदेशाध्यक्ष रामेश्वर वाघमारे, तालुकाध्यक्ष पीराजी जगताप, उपाध्यक्ष किशन बोकेफोड, सचिव मोहन केवळ, याच्यासह सर्व कर्मचारी हे या संपात सहभाग घेतला होता.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...