भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आजपासून चौथा कसोटी सामना अहमदाबादमध्ये सुरु होणार आहे. मॅचचा आजचा पहिला दिवस खास आहे. कारण टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचा उत्साह वाढवण्यासाठी दोन्ही देशाचे पंतप्रधान मैदानावर उपस्थित असतील. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दाखल झाल्यावर पंतप्रधान मोदींनी गळाभेट घेऊन स्टेडियममध्ये त्यांच स्वागत केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी टॉसच्यावेळी मैदानावर दिसतील. मोदी कॉमेंट्री करणार अशीही चर्चा आहे. भारतीय टीमने या सीरीजमध्ये पहिले दोन कसोटी सामने जिंकून सीरीजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने तिसरा इंदोर कसोटी सामना जिंकून सीरीजमध्ये पुनरागमन केलय.
टीम इंडियाने नागपूर आणि दिल्ली टेस्ट मॅच जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाने इंदोर कसोटीत बाजी मारली. टीम इंडिया या सीरीजमध्ये 2-1 ने आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियन टीमने आधीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताला WTC च्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी चौथा कसोटी सामना जिंकावाच लागेल.
भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान येणार असल्याने एका खास रथ बनवण्यात आला होता. त्यामधून पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी संपूर्ण स्टेडियमला एक फेरी मारली व उपस्थित प्रेक्षकांना हात उंचावून अभिवानद केलं.