मोहोळ तालुक्यासह माढा, पंढरपूर, बार्शी या ठिकाणाहून चोरीस गेलेले तेरा ट्रॅक्टर व नऊ ट्रेलर यांच्यासह एक ब्लोअर यंत्र असा एकूण १ कोटी १५ लाख १५ हजाराचा मुद्देमाल मोहोळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या शाखेने हस्तगत करून तिघा संशयतांना अटक केली आहे. सोलापुरात अनेक शेतकऱ्यांची ट्रॅक्टरे व ट्रॉली चोरीला जात होती. ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीला ट्रॅक्टर गॅंग म्हणून ओळखले जाऊ लागले. बघता बघता ट्रॅक्टर हातोहात लंपास करण्याची कला या टोळीत होती. मोहोळ पोलिसांनी ट्रॅक्टर गॅंग मधील तिघांना जेरबंद करून त्यांच्या जवळील ट्रॅक्टर व ट्राली जप्त केले आहे. पप्पू कुबेर ओव्हाळ, उत्कर्ष उर्फ सोन्या नागनाथ पवार, बंडू कुमार पवार (सर्व रा. खरसोळी ता पंढरपूर) अशी संशयीत आरोपीची नावे आहेत. मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, सन २०१८ पासुन माढा, पंढरपूर, बार्शी व मोहोळ या तालुक्यातील ट्रॅक्टर चोरीच्या तक्रारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र संशयीतांचा शोध लागत नव्हता. ही टोळी फक्त ट्रॅक्टर आणि ट्राली चोरी करत असल्याने सोलापूर मध्ये ट्रॅक्टर गॅंगची ओळख निर्माण झाली. शेतकऱ्यांत देखील भीतीचे वातावरण पसरले होते. ट्रॅक्टर गॅंगने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले होते. मोहोळ पोलिसांनी दोन पथके तयार करून ट्रॅक्टर गॅंगचा पर्दाफाश केला व तीन संशयीताना अटक केले.ट्रॅक्टर चोरीच्या तक्रारी वाढल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी गुन्हे अन्वेषण विभागातील कर्मचाऱ्यांची दोन पथके तयार केली.तीन संशयीत आरोपींना जेरबंद केले आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...