नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्ये यंत्रमाग व्यवसायाच्या अडचणी कायम असून दिवाळीत ही या यंत्रमाग मालक व कामगारांचे प्रश्न सुटून न शकल्यामुळे त्यांच्यासमोरील अडचणींचा डोंगर हा कायमच आहे. त्यामुळे यंत्रमाग उद्योग हा मंदीच्या कचाट्यात सापडला आहे
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहराची अर्थव्यवस्था यंत्रमागावर अवलंबून आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ती यंत्रमाग हा उदारनिर्वाहाचा साधन आहे सुमारे अडीच ते तीन लाख यंत्रमाग एकट्या मालेगाव शहरांमध्ये आहे आणि त्यावरती या शहराची आर्थिक व सामाजिक घडामोडी देखील अवलंबून असते परंतु मागील काही दिवसापासून यंत्रमाग उद्योगातल्या कापडाला बाजारामध्ये मागणी नाही त्यामुळे यंत्रमागचा वर त्याचा मोठा परिणाम झाला असून यंत्रमागापासून तयार होणारे कापड घेतले जात नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मंदीचे सावट या व्यवसायावरती आहे याच बरोबरीने यंत्रमाग उद्योगाला अजून काही अडचणींचा सामना करावा लागत आहे त्याचाही परिणाम या मंदी वरती होत आहे.
मात्र चार महिन्यापासून शहरातील यंत्रमाग व्यवसायात खडखडाट असल्याने येथे मंदीचे सावट आहे.याचा परिणाम यंत्रमाग कामगारांवर झाला असून मजुरांना आठवड्यातून तीनच दिवस काम मिळत आहे. येथे रोज लाखो मीटर कापड तयार होते. यात कापडामध्ये पीसी, कॉटन, पॉपलीन, केंब्रीज, रोटो हे कापड तयार होतात. या कापडापासून पेटीकोट, घागरा तयार होता. गेल्या चार महिन्यापासून अशीच परिस्थिती असून हे चक्र दिवाळी सणात दूर होईल असे वाटत होते. परंतु ते तसे न झाल्यामुळे दिवाळी सणात देखील येथील यंत्रमाग कामगारांना हाताला काम मिळाले नाही त्यामुळे या कामगारांची दिवाळी ही साजरी होऊ शकली नाही. केंद्र व राज्य शासनाच्या वस्त्र उद्योग विभागाने कोणत्याही प्रकारचे लक्ष न दिल्यामुळे मालेगाव मधील यंत्रमाग कामगारांचा प्रश्न हा सुटू शकलेला नाही या प्रश्नाकडे लक्ष घालावे अशी मागणी सतत त्याने मालेगाव मधील यंत्रमाग चालविणारे मालक व चालक करीत आहेत.