वसमत तालुक्यातील पार्डी बागल येथील अत्यंत छोट्या गावातील रहिवाशी स्वप्निल चंद्रकांत बागल या विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.
वसमत तालुक्यातील यूपीएससी उत्तीर्ण होणारा स्वप्निल बागल हा प्रथमच मानकरी ठरला, विशेष म्हणजे स्वप्निल हा प्राथमिक शिक्षण वसमत शहरातील छत्रपती विद्यालयातून घेतले आहे तर दहावीपर्यंत शिक्षण वसमत येथीलच जवाहर नवोदय विद्यालयात घेतले आहे तर पुढील शिक्षण हे हैदराबाद व पुणे अशा मोठ्या शहरातून घेतले.
स्वप्निलच्या ह्या यशाबद्दल तालुक्यातून प्रचंड कौतुक होत आहे. तर स्वप्निलच्या कुटुंबावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे सामान्य शेतकरी कुटुंबातील असलेल्या स्वप्नीलने यूपीएससी पास करण्याचे स्वप्न साकार केले आहे. यूपीएससी परीक्षेचा निकाल दिनांक 23 मे रोजी लागला असून यात वसमत तालुक्यातील पार्डी बागल येथील स्वप्निल चंद्रकांत बागल यांनी 504 रँक मिळवत बाजी मारली हे मात्र विशेष.
याप्रसंगी स्वप्नीलचे वडील चंद्रकांत बागल यांच्याशी दैनिक तरुण भारत शी बातचीत करतांना म्हणाले की, स्वप्निल चे प्राथमिक शिक्षण सुरू असल्यापासूनच यु पी एस सी उत्तीर्ण होऊन एक मोठा अधिकारी बनण्याची त्याची आणि माझीही इच्छा होती. स्वप्नील ने माझी ही अपेक्षा पूर्ण केली असल्यामुळे यापेक्षा मोठा आनंद मला कुठलाच नाही.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...