जिंतूर- येलदरी रस्त्यावरील इसार या खाजगी पेट्रोल पंपा जवळ रस्त्यावरून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत प्रवाहाची तार दुचाकी स्वरांच्या अंगावर पडली या घटनेमध्ये दोन महिला सह एक पुरुष गंभीर गंभीरित्या जखमी झाला. सदरील घटना मंगळवार ७ मार्च रोजी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली. घटनेतील तिघांची हि जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील मौजे. पिंपळगाव, काजळे येथील राहुल मळाजी चव्हाण (वय३६)वंदना राहूल चव्हाण (वय ३३) यशोदा सिध्दार्थ चव्हाण(वय ४०)सर्व जण रा. पिंपळगाव काजळे ता. जिंतूर हे सर्वजण आपल्या माणकेश्वर येथील नातेवाईकाला सांत्वन पर भेटीसाठी गेले होते माणकेश्वर येथून गावाकडे परत येत असताना माणकेश्वर पासून काही अंतरावर असलेल्या इस्सार पेट्रोल पंप जवळ असलेली तार अचानकपणे दुचाकी स्वरांच्या अंगावर पडली यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर इजा पोहचल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती.
या वेळेला त्या ठिकाणाहून जाणारे दुचाकी स्वार विठ्ठल राठोड यांनी तत्काळ पोलीस प्रशासन यांच्याशी संपर्क करून सदरील घटनेची माहिती दिली. व संबंधित रुग्णांस तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले यावेळी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने जिंतूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. देविदास गरड यांनी संबंधितांना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले आहे.
महावितरणचा हलगर्जीपणा नागरिकांच्या जीवावर बेतला
चालू वर्षात महावितरणच्या उच्च दाबाच्या विद्युत तारा तुटून नागरिकांना आपला जीव गमावावा लगल्याच्या घटना घडल्या आहेत. महावितरण कडून त्यांची देखभाल दुरुस्ती वेळेवर न केल्याने सदरील अपघात होत आहेत. यामध्ये महावितरणचा बे-जबाबदार पणा हा नागरिकांच्या जीवावर बेतला आहे.