राज ठाकरे हे आज नागपूरच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत आणि मनसैनिकांनी त्यांचा जोरदार स्वागत केले . आज पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आहे नागपूर मध्ये आज नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांना नियुक्ती पत्र देण्याचा कार्यक्रम आहे आणि महत्त्वाची आठवा बैठक असणार आहे. नागपूर महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हा राज ठाकरे यांचा दौरा समजला जातोय कारण महापालिकांच्या आधी बैठक होऊन आज आदेश ते देतात त्यांच्या पदाधिकाऱ्यांनाही बघणार आहेत.
अत्यंत महत्त्वाचे ठरणाऱ्या नागपूरच्या आजच्या दौऱ्याकडे मनसैनिकांच लक्ष आहे . राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी जेव्हा नागपूरच्या दौरा केला होता तेव्हा सांगितलेलं होतं की ज्यांना काम करायचं नाहीये त्यांनी पद सोडा आणि त्यामुळे नवीन पदाधिकाऱ्यांची आता नियुक्ती झाली आहे. अशा पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे आता पुढे काय सल्ला देतात काय कान मंत्र देतात याकरिता सगळ्यांचे लक्ष लागलेलंच आहे आणि त्याच बाजूला आज हिवाळी अधिवेशन सुद्धा सुरू आहे सध्या त्यामुळे या अधिवेशनाच्या दरम्यान काही नेत्यांच्या भेटीगाठी सुद्धा राज ठाकरे तिकडे घेणार आहेत का ? याकडे सुद्धा सगळ्यांचे लक्ष असणार आहे एकंदरीतच सध्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या नागपूर शहरात कडे सगळ्यांचाच लक्ष आहे.