‘आयसीएमआर’ म्हणजेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या अंतर्गत येणार ‘एनएआरआय’ म्हणजेच राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे येथे भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती अंतर्गत ‘प्रकल्प तांत्रिक अधिकारी’, ‘कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी’ पदाच्या ३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज पद्धतीने करायचा असून २२ सप्टेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या:
प्रकल्प तांत्रिक अधिकारी – १ जागा
कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी – २ जागा
एकूण पदसंख्या – ३ जागा
शैक्षणिक पात्रता:
प्रकल्प तांत्रिक अधिकारी – सोशल वर्क, सायकोलोजी, अन्थ्रोपोलोजी, लाईफ सायन्स आदि विषयातून पदवीधर, सामाजिक कार्याचा अनुभव तसेच हिन्दी, मराठी आणि इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान असणेआवश्यक.
कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून एमबीबीएस पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २२ सप्टेंबर २०२३
वेतनश्रेणी:
प्रकल्प तांत्रिक अधिकारी – ३२ हजार रुपये
कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी – ६० हजार रुपये
अधिकृत वेबसाईट: www.nari-icmr.res.in
प्रकल्प तांत्रिक अधिकारी भरती संदर्भात अधिकृत आणि सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी https://drive.google.com/file/d/1afLdGzGzjthy5YKBY2AnZG34wzAVZWCL/view या लिंकवर क्लिक करा.
कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी भरती संदर्भात अधिकृत आणि सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी https://drive.google.com/file/d/1lu12V_J3Jsa7vO0-uHIht9V_IPao7AWX/view या लिंकवर क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: यापदासाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी लिंक मध्ये दिलेली अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.nari-icmr.res.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिसूचनाही दिलेली आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर म्हणजे २२ सप्टेंबर आधी सादर करायचे आहेत.