एमपीसी न्यूज एकाचा तोटा तो दुसऱ्याचा फायदा असतो असे म्हणतात कारण रिक्षा चालकानी केलेला संप हा पीएमपीएमएल प्रशासनाच्या चांगलाच पथ्यावर पडला आहे. या संपामुळे पीएमपीएमएलने सोमवारी (दि. 28) यादिवशी तिकीट विक्री व पास विक्रीतून सुमारे 2 कोटी 4 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवते आहे. जो दैनंदिन उत्पन्नातील उच्चांक मानला जात आहे.
विळेत रिक्षान मिळाल्यामुळे सोमवारी सोमवारी 15 लाख 47 हजार प्रवाशांनी पीएमपीएमएल बससेवेचा वापर केला आहे. संपामुळे दैनंदिन संचलना पेक्षा 100 जादा बसेस संचलनात आणल्या होत्या तसेच सोमवारी तिकीट विक्रीतून कोटी 92 लाख 8 हजार 968 रुपये तर तर पास विक्रीतून 12 लाख 62 हजार 775 रुपये एवढे उत्पन्न एका दिवसात मिळाले आहेत.
संपाचा अंदाज घेत प्रशासनाने ऐनवेळी शंभर जादा बसेस देत पुणे पिंपरी चिंचवड शहरात मिळून अशा हजार 740 बसेस मार्गावर धावल्या (Pune News) वेळेची गरज पाहता दोन्ही शहराच्या हद्दी बाहेरील बसेस बंद करून त्या शहरांतर्गत मार्गावर वळवल्या. यावेळी नागरिकांनी ही प्रशासनाकडे बसचा अनुभव उत्तम असल्याचा प्रतिक्रिया दिल्या. मंजूर कामगार नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशी विद्यार्थी यांना वेळेवर बसचा आधार मिळाला व ते वेळेत त्यांच्या इच्छीतस्थळी पोहचले