एप्रिल ते ऑक्टोबर 2023 या काळातील एकत्रित आकडेवारीनुसार, भारतीय रेल्वेने गेल्या वर्षीच्या 855.64 मेट्रिक टन मालवाहतुकीच्या तुलनेत 887.25 मेट्रिक टन मालवाहतुकीचा टप्पा गाठला आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीमधील मालवाहतुकीच्या तुलनेत अंदाजे 31.61 मेट्रिक टन इतकी जास्त आहे. भारतीय रेल्वेने यंदा 95929.30 कोटी रुपयांचा महसूल मिळवला असून, गेल्या वर्षीच्या 92345.27 कोटी रुपयांच्या तुलनेत यामध्ये सुमारे 3584.03 कोटी रुपयांची वृद्धी झाली आहे.
ऑक्टोबर 2023 मध्ये भारतीय रेल्वेने सुरुवातीच्या स्थानकापासून केलेली मालवाहतूक 129.03 मेट्रिक टन इतकी होती. ऑक्टोबर 2022 मध्ये ती 118.95 मेट्रिक टन इतकी होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या मालवाहतुकीच्या तुलनेत यामध्ये अंदाजे 8.47% वाढ नोंदवली गेली आहे.
मालवाहतुकी द्वारे जमा झालेला महसूल ऑक्टोबर 2022 मध्ये 13353.81 कोटी इतका होता. ऑक्टोबर 2023 मध्ये त्याने 14231.05 कोटी रुपयाचा टप्पा गाठला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये 6.57% इतकी वृद्धी नोंदवली गेली आहे.
ऑक्टोबर 2023 मध्ये भारतीय रेल्वेने मेट्रिक टन कोळसा, 14.81 मेट्रिक टन लोह खनिज, 5.74 मेट्रिक टन पिग आयर्न आणि फिनिश्ड स्टील, 6.32 मेट्रिक टन सिमेंट (क्लिंकर वगळता), 3.62 मेट्रिक टन अन्नधान्य, 5.72 मेट्रिक टन खते, 4.35 मेट्रिक टन खनिजे, 7.15 मेट्रिक टन कंटेनर, आणि 8.55 मेट्रिक टन इतर वस्तूंच्या स्वरूपातील मालवाहतूक केली.
“हंग्री फॉर कार्गो” या मंत्राला अनुसरून, भारतीय रेल्वेने व्यवसाय सुलभतेसाठी तसेच स्पर्धात्मक किमतीला सेवा वितरणामध्ये सुधारणा करण्यासाठी सातत्त्याने प्रयत्न केले आहेत. ग्राहक केंद्रित दृष्टीकोन आणि जलद धोरण निर्मितीच्या सहाय्याने व्यवसाय विकास केंद्रांनी केलेल्या कामामुळे रेल्वेला हे मोठे यश मिळवण्यामध्ये सहाय्य झाले.