Saturday, April 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 25, 2025
in maharashtra, marathwada, mumbai, political, social, top news
0
छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
0
SHARES
94
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील 25-30 वर्षे शहराच्या अपेक्षित लोकसंख्येला शुद्ध व सातत्यपूर्ण पाणीपुरवठा देता येईल अशी योजना पूर्णत्वाकडे जात आहे. 26 द.ल.ली. हा या योजनेतील एक टप्पा आहे. उर्वरित कामेही वेळेत पूर्ण करून शहराला 365 दिवस 24X7 शाश्वत पाणीपुरवठा करता होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

फारोळा येथे 26 द.ल.ली. क्षमता असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे जलपूजन मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण आणि दुग्धविकास व अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार संदिपान भुमरे, खासदार डॉ.कल्याण काळे, खासदार डॉ.भागवत कराड, आमदार नारायण कुचे, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार संजय केणेकर, आमदार सतीश चव्हाण, माजी महापौर नंदकुमार घोडेले, किशोर शितोळे, राजेंद्र जंजाळ, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, महानगर पालिका आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती संभाजीनगर शहरासाठी 2019 मध्ये सुरू झालेल्या या पाणीपुरवठा योजनेला सुरूवातीला 1800 कोटींची मंजुरी मिळाली, महानगरपालिकेचा आर्थिक हिस्सा शासनाने उचलण्याचा निर्णय घेऊन या योजनेला गती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नव्याने सुरू केलेल्या अटल अमृत योजनेत या योजनेचा समावेश करण्यात आला. केंद्र शासनाच्या अटल अमृत योजनेतून हजारो कोटी रूपये महाराष्ट्राला दिले.

56 एमएलडीच्या जुन्या योजनांचे पूर्नजीवन करण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरली. याच योजनेत छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेचा समावेश करण्यात आला असुन 2700 कोटी रूपये एकूण खर्च असलेली ही योजना जलदगतीने सुरू आहे. 2023 मध्ये 18 टक्के वरुन 2025 मध्ये या योजनेची प्रगती 82 टक्क्यांपर्यत पोहोचली आहे. वॉर रूम प्रोजेक्टच्या माध्यमातून योजनेतील अडचणी दूर करून योजनेला गती देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले
शहर पाणीपुरवठा योजनेतील अडथळे बाजूला करून योजना पूर्णत्वाकडे नेत असल्याचा उल्लेख करताना महानगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासह संबंधित यंत्रणांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री म्हणाले, वॉर रुममध्ये झालेल्या आढावा बैठकीत ही योजना जलदगतीने पुढे सरकत असल्याचे दिसून आले. सध्या केवळ काही किरकोळ कामे बाकी आहेत. 56 ईएसआर तयार करण्याचे उद्दिष्ट असून त्यापैकी मोठा भाग पूर्ण झाला आहे. उर्वरित कामेही वेळेत पूर्ण करून पुढील 25-30 वर्षे शहराला 365 दिवस 24X7 शाश्वत पाणीपुरवठा देता येईल.

महानगरपालिकेचा 800 कोटी रूपयांचा हिस्सा शासनाने हुडकोमार्फत उपलब्ध करून दिला आहे. पुढील महिन्यात याबाबतची आवश्यक प्रक्रिया पूर्ण होऊन हा निधी मिळणार आहे. उर्वरित निधीचीही शासनाने तरतूद केली असून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. येत्या डिसेंबरपर्यंत योजना पूर्ण करा असे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

छत्रपती संभाजीनगर हे राज्यातील एक महत्वाचे शहर असून मॅन्युफॅक्चरिंग हब बनत असून औद्योगिक संधी वाढत आहेत. त्याला अनुरूप अशा पायाभूत सुविधा देणे गरजेचे आहे. याच उद्देशाने पाणी पुरवठा योजनेतील उर्वरित कामे जलद गतीने पूर्ण केली जातील. शहरातील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत प्रशासन व लोकप्रतिनिधींनी मिळून चांगले काम केले आहे. अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक निधी शासन उपलब्ध करून देईल. शहराच्या विकासासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी एकत्र येऊन निर्णय घेतात ही बाब महत्वाची आहे. शहराच्या सर्वांगिण विकासासाठी निधीची कमतरता पडु देणार नाही, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी प्रास्ताविक केले. छत्रपती संभाजीनगर शहरास १०० द.ल.लि. आणि ५६ द.ल.लि. क्षमतेच्या दोन पाणी पुरवठा योजना सध्या कार्यान्वित आहेत. त्यातून १२०० मि.मी. लोखंडी, ७०० मी.मी. पाईपलाईन व्दारे १२० द.ल.ली व ९०० मि.मी. व्यासाच्या डीआय पाईप लाईन व्दारे २५ द.ल.ली असा एकुण १४५ द.ल.ली एवढा पाणी पुरवठा होत आहे. सद्यास्थितीत २६ द.ल.ली जलशुध्दीकरण केंद्र कार्यान्वीत करण्यात येत असल्यामुळे पाणी पुरवठ्यात २६ द.ल.ली एवढी वाढ होऊन एकुण १७१ द.ल.ली एवढा पाणीपुरवठा होणार असुन शहरातील नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

२६ द.ल.ली जलशुद्धीकरण केद्रांचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते बटण दाबुन उद्घाटन करण्यात आले. यावेळी जलपूजनही करण्यात आले.

Post Views: 109
Previous Post

ग्रा.पं.च्या बोगस ठरावाविरोधात ग्रामस्थ आक्रमक; चौकशीची मागणी

Next Post

आमदारकी गेली खड्ड्यात, मुंबई, ठाण्यासह पुणेही जाम करू; ओबीसी मोर्चातून विजय वडेट्टीवारांचा सरकारला इशारा, जरांगेंनाही टोला

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post

आमदारकी गेली खड्ड्यात, मुंबई, ठाण्यासह पुणेही जाम करू; ओबीसी मोर्चातून विजय वडेट्टीवारांचा सरकारला इशारा, जरांगेंनाही टोला

ताज्या बातम्या

मंठा तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ कॅमेरा मध्ये कैद

April 11, 2026

व्यसनी तरुणाचा शहर पोलीस ठाण्यासमोर गोंधळ

April 11, 2026

अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पदी इसरारखान पठाण यांची नियुक्ती

April 11, 2026

खा. संदिपान भुमरे यांचा भोकरदन मध्ये एल्गार

April 11, 2026

वालचंद मध्ये युथ वेलनेस रिट्रीट २०२६

April 11, 2026

ईस्लापूर येथे रंगणार शिवजन्मोत्सव सोहळा….

April 11, 2026

संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात करिअर कट्टा उपक्रम साजरा

April 11, 2026

हिंगोलीत 4.7 रिश्टर भूकंप

April 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0802915

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697