देशभरात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांमध्ये सोने आणि चांदीच्या खरेदीची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जर तुम्ही देखील सराफा बाजारात सोने खरेदीचा जाण्याचा विचार करत असाल, तर आज या आठवड्यापेक्षा स्वस्त दरात तुम्हाला मौल्यवान सोनं मिळू शकते. सोने खरेदीसाठी आजचा दिवस अगदी योग्य आहे. मात्र, आज चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे.
सोन्याचे दर
मल्टी कमोडिटी एस्कचेन्जवर आज सोन्याचा दर आज १९१ रुपये किंवा ०.३४ टक्क्यांनी घसरला. सध्या सोन्यासाठी तुम्हाला प्रति १० ग्रामसाठी ५६ हजार १६१ रुपये खर्च करावे लागतील. तर सोन्याच्या या किमती त्याच्या फेब्रुवारीच्या फ्युचर्ससाठी आहेत. लक्षात घ्या की सोमवारी, आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याने ५६,५०० रुपयांचा सर्वकालिक उच्चांकी गाठला होता . अशा प्रकारे सोन्याच्या सर्वकालीन उच्चांकाच्या तुलनेत आज सोने सुमारे ३९० रुपयांनी स्वस्त आहे. याशिवाय एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत १० ग्रॅम सोन्याच्या किमतीत ३९० रुपयांची घसरण लक्षणीय आहे.
चांदीची चमक वाढली
चांदीच्या दरांमध्ये आज तेजी दिसत आहेत. चांदी ५० रुपयांनी वाढून ६९,३७० रुपये प्रति किलो झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चांदीची औद्योगिक मागणी वाढत असल्यामुळे दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहेत. चालू आठवड्यात चांदीचा भाव ७० हजार रुपये प्रति किलोच्या पार पोहोचला होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीची स्थिती
आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोने दरात घसरण होताना दिसत आहे. आज कोमॅक्सवर सोने प्रति औंस $९ पेक्षा जास्त घसरले असून १ ९०१ डॉलर दराने व्यवहार करत आहे. आज सोन्याच्या दरात अर्धा टक्का घसरण नोंदवली गेली. त्याच वेळी सोन्याच्या दरात घसरण होत असताना आज कोमॅक्सवर चांदीचे दर हिरव्या चिन्हात दिसत आहे.चांदीची किंमत ०.२२ टक्क्यांनी वाढून २४.१३ डॉलर प्रति औंस, या दरावर ट्रेड करत आहे.