राज्यात आतापर्यंत ७ हजार ३४१ पशूधन हे लम्पी स्कीन आजाराने बाधित झाले आहे. त्यामुळे या आजाराच्या प्रतिबंधासाठी सर्व पशुधनाचे लसीकरण तातडीने पूर्ण करा आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गोवर्गीय पशुधनावर अधिक लक्ष केंद्रित करावे, असा आदेश राज्याचे पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंडे यांनी पुण्यात एका बैठकीत बोलताना पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांना दिला.लम्पी स्कीन आजाराचा प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सची बैठक आज झाली. या बैठकीत मुंडे बोलत होते.
यावेळी पशुसंवर्धन आयुक्त हेमंत वसेकर, अतिरिक्त आयुक्त शीतलकुमार मुकणे, बेंगळुरू येथील राष्ट्रीय पशू साथरोग शास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान (निवेदी) संस्थेच्या डॉ. मंजुनाथ रेड्डी, ‘माफसू’चे संशोधक संचालक डॉ. नितीन कुरकुरे, विस्तार संचालक अनिल बिकाने, विविध पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि संशोधक उपस्थित होते.