महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली सैन्यातील शौर्यपदक, सेवापदक धारकांना मिळणारे ४ लाख रुपये लेफ्टनंट जनरल माधुरी राजीव कानिटकर(नि.) यांना मंजूर करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत सैन्यातील १६ प्रकारच्या शौर्यपदक सेवा पदक धारकांना शासकीय अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. लेफ्टनंट जनरल कानिटकर यांना राष्ट्रपती सचिवालयाच्या आदेशानुसार परम विशिष्ट सेवा (शौर्यासाठी) हे पदक प्रदान करण्यात आले आहे.शासन निर्णयाप्रमाणे श्री. कानिटकर यांना चार लाख रुपये एवढे अनुदान देण्याचा सैनिक कल्याण पुणे विभागाचे संचालकांच्या प्रस्तावानुसार त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनाखाली चार लाख रुपये अनुदानाची रक्कम मंजूर करण्यात आली असल्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...