कौडगाव परिसरात विज पडुन दोघे जखमी तर धनज व पेनुर येथे विज पडून दोन बैलांचा मृत्यू,काही भागात गारपीट झाली, अनेक भागात वादळाने घरावरील पञे उडाली शेतातील रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .लोहा तालुक्यात दोन दिवस निसर्ग कोपला आहे.यात मानव वस्तीतील घरावरील पञे उडुन घराचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
तालुक्यात मानव जिवित हानी झाली नाही. माळाकोळी,पोलिसवाडी, मंगरुळ,सावरगाव,मस्की हाळदव, माळाकोळी ,बेरळी परिसरात गारपीट झाली. शहरात जोरदार पाऊस कोसळला दुपार नंतर आकाशात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.अचानक आकाशात काळे,कुट वातावरण निर्माण झाले त्या वातावरणातून वादळ,विजांचा कडकडाट, गारपीट सुरू झाला त्यात गोविंद अर्जुन दर्शने वय ६० वर्षे व शिवाजी रामा भरकडे वय ३८ वर्षे रा.कौडगाव या दोघावर गुरुवारी अचानक वीज कोसळली यात दोघे जखमी झाले.
उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले,जखमीची तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन विचारपुस केली. त्यांच्या कुटुंबीयाचे सांत्वन करुन धिर दिला मयत झालेल्या जनावरांच्या शेतकऱ्यांना व वीज पडून जखमीं झालेल्या कुटुंबीयांना तात्काळ शासकीय नियमाप्रमाणे मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. .