लोहा राष्ट्रीय राज्य मार्ग बायपास ३६१ रोड लगत लिंबोटी धरणाचे भुमिगत कॅनॉल आहे. बायपासचे काम करताना कॉनलचे नुकसान झाले असता, गुत्तेदाराने तात्काळ दुरुस्त करणे आवश्यक असताना, गुत्तेदाराने याकडे दुर्लक्ष केले. या कॅनॉल मधुन दरोरोज हाजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे .
उर्धव मनार प्रकल्प लिंबोटी धरणाचे शहरात कार्यालय असुन आधिकारी व अभियंत्याने या कॅनॉलच्या देखभाल दुरुस्तीकडे निष्काळजीपणा केल्याने दरोरोज हाजारो लिटर पाणी वाया जात आहे.
लोहा कंधार उपविभागीय जिल्हाधिकारी शरद मंडलिक यांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करावी कॅनॉलमधुन नासाडी होणाऱे पाणी बंद करावे अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.