मिरज येथुन गायी व बैल कापून त्याचे मांस पिवळ्या नंबरची प्लेट असणारी टोयोटा इटीऑस कार नं MH.02.EH.0953 मध्ये मांस भरून सातारा-पुणे रोडने मुंबईत जाणार असल्याची माहिती मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांना मिळाली…स्वामी यांनी त्यांचे विश्वासू सहकारी कृष्णा तुळशीराम सातपुते यांना पोलिसांची मदत घेऊन गाडी ताब्यात घेण्यास सांगितले.
सदर कार सिंहगड रोड पोलिसांच्या मदतीने रात्री 9:50 च्या सुमारास ताब्यात घेऊन कार चालकास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने 1 ) मोहम्मद हनिफ शेख रा. अंधेरी मुंबई 2) आरिफ अबीद दाऊद रा. गावदेवी डोंगरी मुंबई असे सांगितले…तसेच सदरचे मांस हे गायी बैलाचे असून ते मिरज येथून गाडी मध्ये भरून शहजाद कुरेशी रा. नागपाडा मुबंई यांच्याकडे घेऊन जात असल्याचे सांगितले.
पोलिसांनी पंचासमक्ष कारची डिग्गी उघडून पाहणी केली असता गायी व बैलांचे मुंडके , कातडी काढलेल्या अवस्थेत धड व पाय दिसले. पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला…मा. न्यायालयाने सदर आरोपींना ५ दिवसाची पोलिस कस्टडी दिली आहे.
यासंदर्भात गोरक्षक कृष्णा सातपुते यांनी फिर्याद दिली आहे. या कारवाईत प्रतीक अरोटे , तेजस निंगुळे , विष्णू सातपुते , समीर चोरघे , आशुतोष मारणे , योगेश वालमपल्ले , आकाश गुंजाळ , आदित्य भोसले , वसंत भूतकर , राहुल जाधव , मंगेश वालमपल्ले इ. गोरक्षकांनी सहभाग घेतला.
Post Views: 115