औरंगाबाद – श्री.खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदीर राजाबजार अंतर्गत राष्ट्रसंत पुलकसागरजी महाराज यांच्या सानिध्यात दिनांक ३ जुलै ते ३० ऑक्टोंबर पर्यत चातुर्मासा मध्ये विविध धार्मिक व सामाजिक कार्यकम उत्साहात संपन्न झाले. या कार्यकमाचे संपुर्ण मराठी,हिंदी,इंग्रजी वृत्त्तपत्रात बातम्या व जैन पत्र पत्रिकात प्रकाशित झाल्या अशा पुस्तकाचे विमोचन हिराचंद कासलीवाल प्रांगण आचार्य गुप्तीनंदी गुरâदेव सभागृह येथे राष्ट्रसंत पुलकसागरजी महाराज,मुनिश्री पुलकितसागरजी महाराज,मुनिश्री प्रमुदित सागरजी महाराज, मुनिश्री प्रणितसागरजी महाराज,ऐलक प्रशमितसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच यावेळी चातुर्मास कळस दात्यांचा अभिनंदन समारोह व चातुर्मासामध्ये तन-मन धनाने विशेश सेवा देणा-यांचा सन्मान समारोह आयोजीत करण्यात आला होता.
यावेळी पंचायत व चातुर्मास अध्यक्ष ललीत पाटणी, सचिव अशोक अजमेरा, चातुर्मास कार्याध्यक्ष महावीर पाटणी, चातुर्मास मंत्री प्रकाश अजमेरा,कोषाध्यक्ष एम.आर.बडजाते,सहसचिव नरेंद्र अजमेरा,दिलीप कासलीवाल,प्रमोद पांडे,महावीर ठोले,अशोक छाबडा,अॅड.अनिल कासलीवाल,दीलीप बाकलीवाल,प्रमोद ठोले,विजयकुमार पाटणी,नितीन अजमेरा,पियुष कासलीवाल यांच्यासह विश्श्वस्थ कार्यकारणी मंडळ व समाज बांधव उपस्थि होते.
यावेळी आचार्यश्रींनी सांगीतले की, आपण संत महात्म किंवा परमात्मा होउâ शकत नाही परंतु भगवान महावीरांच्या जीवनापासुन प्रेरणा घेवुन श्रावक नक्की होउâ शकतो. मोठया लोकांपासुन जे कोणी शिकवण घेत नाही ते कधीही यश संपादन करâ शकत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की मृत्य नंतर सुध्दा तुमचे नाव अजरामर व्हावे तर वाचण्याजोगे लिहा किंवा लिहण्याजोगे कार्य करा असे प्रतिपादन राष्ट्रसंत पुलकसागरजी महाराज यांनी केले. जीवन मिळाल्या नंतर मरणाला कधीही विसरता कामा नये असेही आचार्र्यश्रींनी सांगीतले.
यावेळी कार्यकमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक कार्याध्यक्ष महावीर पाटणी, मंत्री प्रकाश अजमेरा यांनी केले.
6r0tz9