आज दि.२१ मार्चपासून प्रत्येक हरभरा खरेदी घेण्याचा शुभारंभ करण्यात आला.याचे उद्घाटन खरेदी केंद्रावर राष्ट्रवादीची ज्येष्ठ नेते मा. मच्छिंद्र तात्या कवडे तसेच जिल्हा मार्केटिंग कमिटीचे अधिकारी भोसले साहेब, ज्येष्ठ शेतकरी बाबुराव बावधनकर, अनिल जगताप, बबन बाबा कवडे, विलास देशमुख, धनंजय कागदे, सूर्यकांत सांडशे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती, तसेच विकास पवार सदस्य, ज्येष्ठ पत्रकार बळीराम जगताप, सुरेश भांडवले, शिवशंकर चौधरी, विशाल गाढवे, अश्रुबा गाढवे आदीच्या हस्ते श्रीफल फोडून सुरुवात करण्यात आली, तसेच सर्व ज्येष्ठांचे पुष्पगुच्छ श्रीफल व शाल घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अॕड.सूर्यकांत सांडसे यांनी सांगितले की, हरभराचा हमीभाव ५३३५ रुपये आहे. आजपर्यंत ६५० शेतकऱ्यांनी नोंदी केलेल्या आहेत, तसेच यापेक्षाही ज्यादा शेतकरी हमीभाव केंद्रात हरभरा आणतील यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत. तसेच हरभरा साठवणूक केंद्र ५०किलोमीटरच्या आत देण्यात यावे. अशी मागणी केली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अॕड.सूर्यकांत सांडसे, विकास पवार, विनोद माने व केंद्रातील कर्मचाऱ्यांनी खूपच परिश्रम घेतले.