संपूर्ण महाराष्ट्र भरात वीज वितरण कंपनीचे सर्व कर्मचारी अधिकारी हे संपावर गेले असल्याने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांच्यामार्फत वीज वितरण कंपनी हिंगोली चे अधीक्षक अभियंता यांनी वसमत तालुक्यातील दिनांक 3 जानेवारी ते 6 जानेवारी च्या संप काळात दुरुस्ती व देखभाल आणि फ्युज कॉल याकरिता मनुष्यबळ पुरवठा करणे याबाबतचे पत्र वसमत येथील सय्यद इमरान अली यांचे अक्सा इलेक्ट्रिक अँड इंजिनियर वर्क्स यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली.
विशेष म्हणजे अक्सा इलेक्ट्रिक अँड इंजिनियर वर्क्स हे नेहमी कऱ्यशील व तत्पर असणारी कंपनी यांनी ही जबाबदारी स्वखुशीने मान्य केली विशेष म्हणजे यात अक्सा इलेक्ट्रिक अँड इंजिनियर वर्क्स चे संचालक सय्यद इमरान अली यांनी सदरील जबाबदारी ही निशुल्क हाती घेतली हे मात्र विशेष.
खाजगी करण् चा विरोधात वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांनी जे लढा उभा केला आहे त्याला माझा एजन्सी मार्फत पाठिंबा आहे, परंतु मी वसमत चा वसमत कर माझे अशी भावना लक्षात घेता वसमतकरांना 24 तास वीजपुरवठा भेटावी व त्यांची काही गैरसोय होऊ नये यामुळे मी ही जबाबदारी पार पाडत आहे.
हा लढा कंपनी व कर्मचारी यांच्या आपसातला आहे त्यामुळे वसमतकरांची असुविधा होऊ नये म्हणून मी ही जबाबदारी निशुल्क हाती घेतलेली आहे यातअक्सा इलेक्ट्रिक अँड इंजिनियर वर्क्स या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे.
यात शेख शफी, मुजफ्फर सौदागर, शेख जाकीर, सतीश कुठे, गंगाधर खैरे, मुंजाजी खंडागळे, मोहम्मद खीझर, शेख आमेर, किशोर चोपडे शेख अरबाज, आदींचा समावेश आहे.
आणि सदरील जबाबदारी कर्तव्य म्हणून पार पाडत आहे असे मत दैनिक तरुण भारत शी बोलताना सय्यद इमरान अली यांनी व्यक्त केले.