विवाह झाला नसल्याचे सांगून विवाहाच्या आमिषातून अत्याचार केल्याची फिर्याद पीडितेने २० एप्रिल रोजी वळसंग पोलिसांत फिर्याद दिली. वळसंग पोलिसांनी या गुन्ह्यातील संशयित आरोपी राकेश रेवण होते. गायकवाड (रा. सेटलमेंट फ्री कॉलनी, सलगर वस्ती) याला रेल्वे स्थानक परिसरातून जेरबंद केले.पीडित महिलेने राकेश गायकवाडविरूद्ध वळसंग पोलिसांत अत्याचार झाल्याबद्दल फिर्याद दाखल झाल्यापासून संशयित पोलिसांना सापडत नव्हता. तत्पूर्वी, आपला विवाह झाला नसून विवाह करण्याच्या अमिषातून राकेशने त्या महिलेवर अत्याचार केले. तसेच एक लाख ६० हजार रुपयांची फसवणूक देखील केली, असे पीडितेचे म्हणणे होते.
पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, उपअधीक्षक श्री. यामावर, वळसंग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल सनगल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उस्मान शेख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने राकेश गायकवाडला १२ ऑगस्ट रोजी सोलापूर रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...