विश्वहिंदू परिषद बजरंग दल गोरक्षा विभागाचे जिल्हाप्रमुख प्रशांत प्रेमचंद परदेशी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दोन ठिकाणी कार्यवाही करण्यात आल्या त्यापैकी पहिल्या कार्यवाहीत वाहन क्र. MH 13 CJ 0894 हे गोवंश तस्करी करीत असलेले वाहन कुर्डूवाडी येथे पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आले. व 35 गोवंशाना कत्तलीपासून जीवनदान देण्यात आले.
त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुका येथील मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांच्या मदतीने कत्तलखान्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणी एक मिनी आयशर क्र.MH 13 Q 7393 हे वाहन गोमासाने गच्च भरलेल्या स्थितीत निदर्शनास आले असता ते वाहन ताब्यात घेण्यात आले. पंढरपूर येथे रात्री 11 वाजता च्या दरम्यान एक आयशर क्रमांक MH 13 R 2362 वाहनात 13 गोवंश अगदी दाटीवाटीने कोंबून त्यांचे तोंड व चारही पाय दोरखंडाने बांधलेल्या अवस्थेत निदर्शनास आले व सदरील गोवंश हे कत्तलीच्या उद्देशाने नेत असताना या वाहनास पकडण्यात आले. अशी माहिती विश्वहिंदू परिषद बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख गोरक्षक श्री.प्रशांत प्रेमचंद परदेशी यांनी दिली.
पंढरपूर येथील कारवाई यशस्वी करण्याकरिता पुणे येथील गोरक्षक श्री शिवशंकर स्वामी (मानद पशु कल्याण अधिकारी) विश्वहिंदू परिषद बजरंग दल जिल्हाप्रमुख गोरक्षा विभाग सोलापूरचे प्रशांत परदेशी, उपजिल्हाप्रमुख योगीराज जडगोणार, गोरक्षक प्रतीक भेगडे,पवनकुमार कोमटी,कृष्णा सातपुते,विनायक निकते,तानाजी अस्वले, राहुल लंगडेवाले,दादासाहेब ढेरे , सिद्राम चरकूपल्ली,अविनाश कैय्यावाले, अविनाश मदनावाले, सतीश सिरसिल्ला, विरू मंचाल आदी गोरक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.