शरद पवार यांचा राजीनामा निवड समितीने एकमताने फेटाळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम रहावे, अशी शरद पवारांना विनंती करणार आहेत, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर गोंधळाचे आणि असंतोषाचे वातावरण होते. त्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांत या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावू, असे कालच शरद पवारांनी आश्वासन दिले होते. त्यानंतर समितीची आज बैठक झाली. त्यात अपेक्षेप्रमाणे शरद पवारांचा राजीनामा फेटाळला गेला.
– राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांच्याह इतर नेते सिल्व्हर ओकवर पोहचले आहेत. शरद पवारांची भेट घेऊन त्यांना राजीनामा नामंजूर केल्याची माहिती देणार. कार्यकर्त्यांचा भावना कळवणार.
– प्रफुल्ल पटेल आणि आमचे नेते शरद पवारांची भेट घेणार आहेत. त्यांना समितीचा निर्णय कळवणार आहेत. – जयंत पाटील
– शरद पवारांनी दिलेला राजीनामा आम्ही नामंजूर करत आहेत. त्यांनी पदावर कायम रहावे, अशी विनंती करत आहोत. देशातले सगळे नेते इथे आलेत. त्यांना आमचा निर्णय, भावना मान्य करावाच लागेल. – छगन भुजबळ
– शरद पवार यांचा राजीनामा समितीने एकमताने नामंजूर केल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. तसेच पवार यांनीच अध्यक्षपदी रहावे अशी विनंती करणार असल्याचे जाहीर करताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर कार्यर्त्यांनी जल्लोष केला.
– शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला. मात्र, एकमताने हा राजीनामा नामंजूर करण्यात येत आहे. त्यांनी पक्षाध्यपदी रहावे अशी विनंती केली आहे. – प्रफुल्ल पटेल.
– समितीने या बैठकीत एक ठराव सर्वानुमते पारित केला आहे. तो ठराव मी वाचून दाखवणार आहे. – प्रफुल्ल पटेल.
– शरद पवार यांनी आम्हाला कोणालाही विश्वास न घेता निर्णय जाहीर केला. समितीची बैठक पार पडली. – प्रफुल्ल पटेल.
– शरद पवारांच्या राजीनाम्याचे पडसाद राज्यभर, देशात आणि गावागावात पडलेले दिसत आहेत. कार्यकर्त्यांच्या मनात वेदना, दुःख, नाराजी आहे. – प्रफुल्ल पटेल.
– शरद पवारांचा अनुभव आणि त्यांचा व्याप देशाच्या प्रत्येक राज्यात दिसत आहे. – प्रफुल्ल पटेल.
– शरद पवार यांची आज देशाला, राज्याला आणि पक्षाला खूप मोठी गरज आहे. तेच पक्षाचे आधारस्तंभ आहेत. – प्रफुल्ल पटेल.
– यशवंतराव चव्हाण केंद्रात कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमानंतरही पवारांनी राजीनामा मागे घ्यावा असे आम्ही साकडे घातले. – प्रफुल्ल पटेल.
– शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे आम्ही सगळेच स्तब्ध झालो. आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. पवार साहेब असा निर्णय जाहीर करतील. – प्रफुल्ल पटेल.
– प्रफुल्ल पटेल यांची पत्रकार परिषद सुरू. आतापर्यंत काय-काय झाले, पवारांचा राजीनामा ते समितीची स्थापना हा इतिहास सांगितला.
– मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू. शरद पवारांनी अध्यक्ष रहावे, असे साकडे.
– शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
– शरद पवार थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात येण्याची शक्यता.
– राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न सुरू.
– कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या भावुक झालेल्या कार्यकर्त्याला इतरांनी रोखले.
– मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्याने आत्महदहनाचा प्रयत्न केला.
– समितीची शिफारस शरद पवारांना कळवणार. पवारांनी समितीचा निर्णय यापूर्वीच मान्य असल्याचे म्हटले आहे. आता ते काय निर्णय घेतील, याकडे लक्ष आहे.
– शरद पवारांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला आहे. शरद पवारच राहणार अध्यक्ष. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतला मोठा निर्णय.