औरंगाबाद, 04 नोव्हेंबर 2022 ः
स्मार्ट सिटी अभियानातून सुरू केलेल्या शहर बसच्या ताफ्यात ३५ एसी इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहेत. त्यानुसार हैदराबाद येथील कंपनीसोबत करार करण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात एप्रिल महिन्यात १५ तर त्यानंतर २० बस शहरात येतील, असे महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरुवारी (ता. तीन) सांगितले.
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी २०१८ मध्ये औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने शंभर बस खरेदी करीत शहर बससेवा सुरू केली होती. यातील ५७ बस सध्या रस्त्यावर धावत आहेत. दरम्यान तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शासनाच्या धोरणानुसार इलेक्ट्रीक बस सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. पण श्री. पांडेय यांची बदली झाली व डॉ. अभिजित चौधरी यांनी पदभार घेतला. त्यानंतर श्री. चौधरी यांनी या प्रक्रियेला काही काळ स्थगिती दिली होती. असे असतानाच त्यांनी इलेक्ट्रीक बस सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
गुरुवारी पत्रकारांसोबत बोलताना डॉ. चौधरी म्हणाले, की येत्या सहा महिन्यात ३५ ई-बस सुरु करण्याचा प्रयत्न असेल. लेटर ऑफ अवॉर्ड हैदराबाद येथील इव्ही ट्रांसपोर्ट या कंपनीला देण्यात आले आहे. ही कंपनी इ-बस पुरवेल, इ-बस चालवण्यासाठीचे चालक-वाहक, अन्य कर्मचारीवर्ग, चार्जिंग सेंटर्स देखील ही कंपनी उपलब्ध करून देणार आहे. एप्रिल महिन्यापर्यंत पंधरा बस तर पुढील तीन महिन्यात उर्वरित वीस बस प्राप्त होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...