लातूर जिल्ह्यातील शिवली (ता. औसा) येथील हनुमान विद्यालयाच्या हॉलीबॉल (मुली) च्या संघाने 14 वर्ष 17 वर्ष व 19 वर्ष वयोगटातील संघाने विभागीय स्पर्धेसाठी उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी विद्यालय येथे पार पडलेल्या स्पर्धेत सहभाग नोंदवला. यातील 19 वर्ष वयोगटातील मुलीच्या संघाने विभागीय स्पर्धेचे विजेते पद पटकावले आहे. तर 14 वर्ष व 17 वर्षे वयोगटातील मुलीच्या संघांना दुसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या विजयामुळे हनुमान विद्यालय शिवलीच्या 19 वर्ष वयोगटातील मुलीचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. विभागीय पातळीवर हनुमान विद्यालयाच्या या तिन्ही संघाने नेत्र दीपक कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या यशामुळे संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार जाधव पदाधिकारी मोहन साळुंखे मुख्याध्यापक संदिपान माळी क्रीडा शिक्षक गरड सर, रोंगे सर, आणि ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. क्रिडा क्षेत्रातून या संघाचे कौतूक होत आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...