या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, साई पार्क नगर शेळगी येथील महेश वालेच्या कारखान्यावर अज्ञात व्यक्तींनी तोडफोड करत एका कामगाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. कारखान्या समोर असलेल्या एका शेता मध्ये दारूची पार्टी करून कारखान्यासमोर आले. तेथे कारखान्यात काम करणारे कामगार हे जेवण तयार करत होते. त्या ठिकाणी येऊन आम्हाला पण चिकन करून दे असे दमदाटी केली. तेथील कामगाराने मी चिकन तयार करून देत नाही म्हंटले असता तू आम्हाला चिकन का तयार करून देत नही असे म्हणत त्या कामगारांवर हल्ला केला. आणि कारखान्याची तोडफोड करण्यात आली. यात कारखान्यातील असलेले वस्तूचे मोठे नुकसान झाले असून एक कामगाराला बेदम मारहाण करण्यात आली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच कारखान्याचे मालकांनी घटना स्थळी धाव घेतली आणि कामगार जखमी अवस्थेत उपचारासाठी पाठवण्यात आले. सदर घटने बाबत मालकांनी जोडभवी पेठ पोलीस स्टेशन गाटले आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...