जिंतूर प्रतिनिधी,
जिंतूर तालुक्यातील शेवडी गावात शेतातील सोयाबीन मळणी यंत्रणे काढत असताना अचानक मधमाश्यानी हल्ला करत चावा घेतल्याने 10 शेतकरी जख्मी अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता.प्रथमीक उपचार करून तीघाना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
जिंतूर तालुक्यात सर्व गाव परिसरात शेतीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे दरम्यान शेवडी शेतशिवारात दि.25 नोव्हेंबर 4 वाजता एका शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन मळणी यंत्रणे काम सुरू असताना यंत्रांचा धुर बाजूला लिंबाच्या झाडांवर अंग्या मवळा कडे वळाल्याने अचानक मधमाश्यानी काम करत असलेले शेतकरी, शेतमजूर च्या शरीरावर धाव घेत चावा घेतला दरम्यान काही काही नागरिकांनी आगेने जाळ करून धुर सोडल्यावर मधमाश्यांनी पळ काढल्यानंतर जख्मी भानुदास सानप वय 50 वर्ष, गणेश मुंडे 19 उर्मिला सानप वय 30 वर्षे, बालाजी सानप वय 30 वर्षे, शोभा मुंडे वय 40 वर्ष पंढरी घुगे वय 40 वर्ष, शंकर खाडे वय 19 वर्षे, रंजना नागरे वय 40 वर्ष, नारायण सानप वय 43 वर्ष ,बाळू घुगे वय 22 वर्ष, यांना ग्रामस्थ नागरिकांनी खाजगी वहानात टाकून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ.अनिफ खान यांनी दहाची दहा जख्मी नागरिकांवर प्राथमिक उपचार केले मात्र भानुदास सानप गणेश मुंडे उर्मिला सानप तीघाना उलट्या होत असल्याने त्यांना नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असल्याची माहिती ग्रामस्थांच्या वतीने मिळत आहे.