” शिवशंकर स्वामींच्या गोरक्षणाच्या तळमळीला जोड नाही ते बेजोड आहेत. आज पहाटे उज्जैनकडे महाकालच्या दर्शनाला जात असताना घारगाव हद्दीत असुरी वृत्तीचे कसाई गोमाता- नवजात गोवंशाला कापण्यासाठी घेऊन चालले होते वाहतुकीच्या टेम्पोवर आपली बारीक नज़र सुटू न देता तो टेम्पो स्वामींनी अचुक हेरला आणि वेळेत घेरला. कसायांनी जसं स्वामींना पाहिलं तसं वाट फुटेल तिकडे टेम्पो जाग्यावर सोडून जिवाच्या आकांताने पळत सुटले. ..कदाचित आपल्या कर्माची फळे समोर तात्काळ दिसली असतील त्यामुळेच कसाई परागंदा झाले. आज समस्त भारत वर्षाचा सर्वात मोठा उत्सव गोकुळाष्टमी ….आज स्वामींनी भगवान श्री सर्वोत्तम सेवा रुजु केली.
सदर टेम्पोला समोर जय म्हलार नाव लिहलेले आणि गाडी कसायाच्या नावावर टेम्पोत 9 गोवंश दाटीवाटीने कोंबून भरलेले होती. त्यापैकी एक गाय खाली पडून उभे असलेले जनावरांचे पाय तिच्या अंगावर पडून ती तुडविली जात होती. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करून सर्व जनावरे संगमनेर येथील गोशाळेत सुखरूप सोडली.