श्रीतुळजाभवानी देविच्या दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांना उन्हाचा ञास होवु नये म्हणून मंदीर समितीने उन्ह लागु नये म्हणून वर पडदे व जमिनीवर मँट अंथरल्याने भाविकांना ऊन व पाय पोळण्यापासुन दिलासा मिळाला आहे.
श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानने यंदा मंदीर प्रशासकीय मुख्य कार्यालय व महाध्दार समोर पडदे लावलेआहेत तेथुन जुने प्रशासकीय कार्यालय निंबाळकर दरवाजा समोर व होमकुंडा ते शिवाजी दरवाजा ते परत होमकुंड असे उन्हापासुन संरक्षण होण्यासाठी वरच्या बाजूला पडदे लावले असुन जमिनीवर गोलाकार मँट अंथरले आहे.
तसेच मंदीर गर्भगृहात थंडगार कुलर लावल्याने उन्हातुन व पाय पोळत मंदीरात दाखल झालेल्या भाविकांना मंदीरात प्रवेश करताच भाविकांना ऐकदम थंडगार असे दिलासा दायक वातावरण अनुभवास येत असल्याने भाविकांना मनभावे देवीदर्शन घेण्यासाठी मिळत असल्याने भाविक मंदीर समितीला धन्यवाद देत आहेत.
सदरील काम प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसिलदार योगिता कोल्हे यांच्या मार्गदर्शन खाली धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे सह सहकार्यांनी केले
