प्रभू श्रीरामचंद्र की जय…. या जयघोषात मंठा येथे श्रीराम जयंती मिरवणुक काढण्यात आली. श्रीराम भक्तांचा प्रचंड उत्साह या मिरवणुकीत पहावयास मिळाला. श्रीराम नवमीनिमित्त गुरुवार (ता.30) रोजी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्री रामाच्या भव्य अशा प्रतिकृतीने मंठेकरांचे लक्ष वेधून घेतले. चलो अयोध्या धाम…. बनायेंगे मंदिर… प्रभू श्रीरामचंद्र की जय… या जय घोषात व भजनाच्या तालावर श्रीराम भक्त भगवे झेंडे हाती घेऊन मंठेकरांचा उत्साह वाढवीत होते.
राजे संभाजी चौकातून बसस्थानक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे श्रीराम मंदिर येथे मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले. श्रीराम जयंतीची मिरवणूक पाहण्यासाठी शहरातील महिला भगिनीसह अबाल वृद्धांनी गर्दी केली होती. श्रीराम जयंती शोभायात्रा समितीच्या वतीने मिरवणुकीचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. या मिरवणुकीत मंठा शहरासह तालुक्यातील श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
5bexpd
wlsr89