श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची ९२ मीटर अनधिकृत चिमणी पाडल्यानंतर आगामी गाळप हंगाम घेता यावा म्हणून कारखाना प्रशासनाने त्याच जागेवर ३० मीटर चिमणी बांधकामाला परवानगी द्यावी, असा अर्ज महापालिकेकडे केला आहे. ऑफलाइन अर्ज केल्यावर कारखान्याला ऑनलाइन अर्ज करायला लावला. आठ-दहा दिवसांपूर्वी कारखान्याने तसाही अर्ज केला, पण अद्याप महापालिकेकडून त्यावर निर्णय झालेला नाही.साखर कारखान्याचा ऊस गाळप हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरु होईल, अशी सद्य:स्थिती आहे.
तत्पूर्वी, श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याला त्यांच्या सभासदांचा ऊस गाळप करता यावा या हेतूने पहिल्या चिमणीच्या जागेवरच नवीन ३० मीटर चिमणी बांधकामाला परवानगी द्यावी, अशी प्रमुख मागणी कारखाना प्रशासनाची आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण तो होवू शकला नाही.