समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात झाला असून सैलानी बाबांचे दर्शन घेऊन नाशिक निफाडकडे जाणारी टेम्पो ट्रॅव्हलर गाडी रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून २३ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती वैजापूर पोलिसांनी दिली. हा अपघात रात्री १२ ते १ वाजेच्या दरम्यान जांबरगाव टोल नाका येथे घडला. या प्रकरणाची नोंद वैजापूर पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे.
अपघातात एकूण २३ प्रवासी गंभीर जखमी झाले असून जखमींवर वैजापूर व छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी व इंदिरानगर भागातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपघातातील मृतांची नावे :
तनुश्री लखन सोळसे (वय ५ ,रा. समता नगर नाशिक)
संगीता विलास अस्वले (वय ४०, रा. वणासगाव, निफाड)
कांताबाई रमेश जगताप (वय ३८,रा. राजू नगर नाशिक)
रतन जमधडे (वय ४५, रा. संत कबीर नगर नाशिक)
काजल लखन सोळसे (वय ३२,रा. समता नगर नाशिक)
रजनी गौतम तपासे (वय ३२, रा. गवळणी, नाशिक)
हौसाबाई आनंदा शिरसाट (वय ७०, रा. उगाव ता. निफाड जि. नाशिक)
झुंबर काशिनाथ गांगुर्डे (वय ५०, रा. राजू नगर नाशिक)
अशोक झुंबर गांगुर्डे (वय १८रा. राजू नगर नाशिक)
संगीता झुंबर गांगुर्डे (वय ४०,रा. राजू नगर नाशिक)
मिलिंद पगारे (वय ५०, रा. कोकणगाव ओझर ता. निफाड जि. नाशिक)
दिलीप प्रभाकर केळाणे (वय ४७, रा. बसवंत पिंपळगाव नाशिक)
जखमींची नावे :
पूजा संदीप अस्वले, वय ३५ वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक.
वैष्णवी संदीप अस्वले, वय १२ वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक.
ज्योती दिपक केकाणे, वय ३५ वर्ष, रा. पिंपळगाव,ता.निफाड, जि. नाशिक
कमलेश दगु म्हस्के, वय ३२ वर्ष, रा. राहुलनगर, नाशिक
संदीप रघुनाथ अस्वले, वय ३८ वर्ष, रा. तिरुपतीनगर, जेलरोड, नाशिक.
युवराज विलास साबळे, वय १८ वर्ष, रा. इंदिरानगर, नाशिक.
कमलबाई छबु म्हस्के, वय ७७ वर्ष, रा. ममदापूर, नाशिक.
संगीता दगडु म्हस्के, वय ६० वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक.
दगु सुखदेव म्हस्के, वय ५० वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक.
लखन शंकर सोळसे, वय २८ वर्ष, रा. समतानगर, नाशिक.
गिरजेश्वरी संदीप अस्वले, वय १० वर्ष, रा. नाशिक.
शांताबाई नामदेव म्हस्के, वय ४० वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक.
अनील लहानु साबळे, वय ३२ वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक.
तन्मय लक्ष्मण कांबळे, वय ८ वर्ष, रा. पिंपळगाव,ता.निफाड, जि. नाशिक.
सोनाली आप्पासाहेब त्रिभुवन, वय २५ वर्ष, रा. वैजापुर
श्रीहरी दिपक केकाणे, वय १२ वर्ष, रा. पिंपळगाव,ता.निफाड, जि. नाशिक.
सम्राट दिपक केकाणे, वय ६ वर्ष, रा. पिंपळगाव,ता.निफाड, जि. नाशिक.